महाराष्ट्र

maharashtra

जम्मू-काश्मीरच्या राजौरीत चकमक; एक जवान जखमी, तर जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन

By

Published : Jun 30, 2021, 12:18 PM IST

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शोध मोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुप्त माहितीच्याआधारे मंगळवारी सायंकाळी नियंत्रण रेषेलगत असलेल्या गावात आणि आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

जम्मू काश्मीर न्यूज
जम्मू काश्मीर न्यूज

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शोध मोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुप्त माहितीच्याआधारे मंगळवारी सायंकाळी नियंत्रण रेषेलगत असलेल्या गावात आणि आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात सैन्याचा एक जवान जखमी झाला. जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात सध्या ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सैन्य पाठविण्यात आले असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रविवारी जम्मूत हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा जम्मूच्या कालूचक आणि कुंजवानी भागात सैनिकी तळाजवळ दोन ड्रोन घोंघावताना दिसले. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून हेरगिरी आणि हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहेत. कारण, थेट हल्ल्यापेक्षा ड्रोन हल्ले करण्यात हल्लेखोरांना कमी जोखीम उचलावी लागते.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा -

श्रीनगरच्या मल्हूरा परीमपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोघांपैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. अबरार असं या कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर दुसरा पाकिस्तानी नागरिक होता.

हेही वाचा -पुलवामा : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार; माजी पोलीस अधिकारी आणि पत्नीचा मृत्यू

हेही वाचा -काश्मीर पोलिसांना मोठे यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडरला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details