महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2022, 10:08 PM IST

ETV Bharat / bharat

Rhinos Hit By Truck: काझीरंग्यात ट्रकची गेंड्यांना धडक; मुख्यमंत्र्याकडून घटनेची दखल

आसाममधील काझीरंगा येथे भरधाव ट्रकने एका गेंड्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी ट्रक जप्त करून त्याला दंड ठोठावला आहे.

काझीरंग्यात ट्रकची गेंड्यांना धडक
काझीरंग्यात ट्रकची गेंड्यांना धडक

नागाव (आसाम) - काझीरंगा येथे भरधाव ट्रकने गेंड्याच्या पिलाला धडक दिली. काझीरंगा येथील हल्दीबारी अॅनिमल कॉरिडॉरवर जोरहाटहून गुवाहाटीकडे ट्रक जात असताना ही घटना घडली. तेवढ्यात त्या भरधाव ट्रकसमोर एक मोठा गेंडा आला. ट्रकचे नियंत्रण सुटले आणि त्याला धडक दिली. ट्रकच्या धडकेत गेंडा जखमी झाला. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरातील या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक गेंडा वेगात येणाऱ्या ट्रकला धडकताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ट्रक चालकावर कारवाई करत त्याला दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती दिली आहे.

काझीरंग्यात ट्रकची गेंड्यांना धडक

एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम - प्रत्यक्षात पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या विस्तारामुळे रस्ते अपघातात वन्यप्राण्यांचा मृत्यू हा चिंतेचा विषय ठरत आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्रक चालकावर त्वरीत कारवाई करण्यावर भर दिला. सरकार ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाहने चालवू देणार नाही, असे ते म्हणाले. गेंडा हे आमचे खास प्राणी मित्र आहे. आम्ही त्यांच्या हद्दीत कोणतेही उल्लंघन होऊ देणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. वाहन थांबवून दंड वसूल करण्यात आला आहे. काझीरंगातील प्राण्यांना वाचवण्यासाठी सरकार 32 किमीच्या विशेष एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम करत आहे असही ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details