नवी दिल्ली- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतत चिंता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखालील उच्चस्तरीय समितीची कोरोना लसीकरणाबाबत शनिवारी बैठक झाली. या समितीने देशातील कोरोना लसीकरणाची माहिती घेतली.
देशातील सर्व प्रौढांना वर्षाखेर लस देण्याचे लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी देशातील लसीकरणाची स्थिती जाणून गेतल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांमध्ये ३७.७ दशलक्ष कोरोना लशींचा वापर करण्यात आले आहे. हे प्रमाण मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा या देशांच्या एकूण लोकसंख्येहून अधिक आहे.
हेही वाचा-राकेश टिकैत यांना गाझियाबादमध्ये अटक केल्याचे वृत्त खोटे
लसीकरणाबाबत पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त-
देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ४५ वयोगटाहून अधिक नागरिकांचे ५० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्याची बैठकीत माहिती देण्यात आली आहे. तर १६ जिल्ह्यांमध्ये ४५ वयोगटाहून अधिक नागरिकांचे ९० लसीकरण झाल्याची माहिती देण्यात आली. या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढत असल्याने पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. जास्तीत जास्त लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिता एनजीओ आणि इतर संस्थांनाही मोहिमेत सहभागी करण्याचे पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सूचविले आहे.