महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'माध्यमांवर आवर घाला' म्हणत दाखल केली याचिका; उच्च न्यायालय म्हणाले 'रिमोट तर तुमच्याच हातात'

कोविड रुग्णांचे मृत्यू, मोठ्या प्रमाणात होत असलेले सामूहिक अंत्यसंस्कार आणि नातेवाईकांचे शोक हे दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती आणि मानसिक तणाव निर्माण होतो आहे. त्यामुळे असे काही दाखवणाऱ्या माध्यमांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती...

By

Published : May 13, 2021, 8:17 AM IST

PIL seeks action against media over airing COVID-19 content' HC says 'remote in your hands'
'माध्यमांवर आवर घाला' म्हणत दाखल केली याचिका; उच्च न्यायालय म्हणाले 'रिमोट तर तुमच्याच हातात'

बंगळुरू : माध्यमांनी कोरोनाबाबतच्या बातम्या दाखवून लोकांमध्ये भीती पसरवू नये, अशा आशयाची याचिका कर्नाटकच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने 'रिमोट तर तुमच्याच हातात आहे' असे म्हणत या याचिकेला केराची टोपली दाखवली.

किट फाऊंडेशन या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. कोविड रुग्णांचे मृत्यू, मोठ्या प्रमाणात होत असलेले सामूहिक अंत्यसंस्कार आणि नातेवाईकांचे शोक हे दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती आणि मानसिक तणाव निर्माण होतो आहे. त्यामुळे असे काही दाखवणाऱ्या माध्यमांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तसेच, माध्यमांवर महामारीबाबत प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यात यावी असेही यात म्हटले होते.

न्यायमूर्ती ए.एस. ओका यांच्या खंडपीठामध्ये या याचिकेवर सुनावणी पार पडली. टीव्हीचा रिमोट हा लोकांच्याच हातात आहे. अशा प्रकारची दृश्ये त्यांना पहायची नसतील, तर तो चॅलन बदलण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. त्यांच्याकडे तो पर्याय आहे, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका रद्द केली.

हेही वाचा :अमित शाह बेपत्ता...? एनएसयूआय नेत्याने नोंदवली तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details