महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2022, 7:34 PM IST

Updated : Oct 30, 2022, 9:57 PM IST

ETV Bharat / bharat

Morbi Zulta bridge: मोरबी येथील केबल झुलता पूल तुटला, ७० जण ठार; ३५ हून अधिक जखमी

गुजरातमधील मोरबी येथे केबल पूल कोसळल्याने अनेक लोक पाण्यात पडले आहेत. बचावकार्य सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पंतप्रधान मोदींनी घटनेची माहिती घेतली आहे. पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना (PMNRF)कडून 2 लाख रुपयांची मदतजाहीर केली आहे. तर, गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मोरबीचा झुलता पूल
मोरबीचा झुलता पूल

मोरबी (गुजरात) - गुजरातच्या मोरबीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मच्छू नदीवर बांधलेला प्रसिद्ध केबल पूल आज रविवार (दि. 30 ऑक्टोबर)रोजी सायंकाळी अचानक तुटला. हा पूल तुटल्याने अनेक जण पाण्यात पडले आहेत. नदीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ७० जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. गृह राज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ हुन अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

मोरबीचा झुलता पूल तुटला

पोलीस आणि प्रशासनासोबतच स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही दाखल झाली आहे. पाच दिवसांपूर्वीच या केबल पुलाची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दुरुस्तीनंतरही एवढ्या मोठ्या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघातानंतरचे चित्र समोर आले आहे. केबल ब्रिज कसा तुटला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्या दरम्यान हा अपघात झाला, त्या पुलावर जवळपास 400 लोक होते, असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी दुर्घटनेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तातडीने पथके तैनात करण्यास सांगितले. मोदींनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मोरबी येथे केबल पूल कोसळल्याची घटना दुःखद आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे असही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाचे ट्विट
राष्ट्रपती यांचे ट्विट

मी पंतप्रधानांसोबतचा पुढील कार्यक्रम आटोपून गांधीनगरला पोहोचत आहे. गृह राज्यमंत्र्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यात मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. बचाव कार्यात एसडीआरएफसह तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. त्याच वेळी, गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान कार्यालयाचे ट्विट

'गुजरातमधील मोरबी येथील दुर्घटनेने मी चिंतेत आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडित लोकांसोबत आहेत. मदत आणि बचाव कार्यामुळे पीडितांना दिलासा मिळेल असे ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. तर, गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'मोरबी येथील अपघातामुळे मला खूप दु:ख झाले आहे. मी या संदर्भात गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी मदतकार्यात गुंतले आहे, एनडीआरएफही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Last Updated : Oct 30, 2022, 9:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details