महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2023, 9:56 AM IST

ETV Bharat / bharat

Tamil Nadu Violence : तामिळनाडूत बिहारी मजूरांवर हल्ले, जीवाच्या भीतीने अनेक मजूर परतले

तामिळनाडूतील हिंदी भाषिकांवर हल्ल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून घाबरलेले अनेक स्थलांतरित मजूर गुरुवारी रात्री घरी परतले आहेत. परत आलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मनात भीतीने घर केले आहे. तेथील परिस्थितीचे वर्णन करताना मजुरांनी त्यांना त्यांच्याच राज्यात रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Tamil Nadu violence
तामिळनाडूत बिहारी मजूरांवर हल्ले

जीवाच्या भीतीने अनेक मजूर परतले

जमुई (बिहार) : बिहारमधील अनेक स्थलांतरित मजूर तामिळनाडूमध्ये राहतात आणि तेथेच काम करतात. त्यांना बरेचदा हिंदी भाषिक म्हणून त्रासही दिला जातो. आता बिहारमधील मजुरांना तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा वाईट वागणूक देण्यात आली आहे. यावरून राजकारणही तापले आहे. बिहार सरकारने घटनेच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत, तर तामिळनाडू प्रशासनाने सर्व उत्तर भारतीय पूर्णपणे सुरक्षित आहेत, घाबरण्याची गरज नाही, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारमधील बरेच मजूर घरी परतले : बिहारमधील जमुईच्या बासबुट्टी गावात परतलेला प्रवासी मजूर राहुलने आपला अनुभव सांगताना म्हटले की, तो गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडू मध्ये राहत होता. तेथे तो एका लोखंड कंपनीत काम करत होता. त्याबदल्यात त्याला दररोज 650 रुपये मिळत होते. कमी - अधिक प्रमाणात अशाच प्रकारचे अनुभव तामिळनाडूहून परतलेल्या अजित राम, प्रमोद, बिरेंदर, कार्तिक, नितीश पासवान, विपिन पासवान आणि रोहित या मजुरांचेही आहेत. स्थलांतरित मजूर मुकेश पासवान सांगतो की, त्याने स्वत:च्या डोळ्यांनी बिहारींची मारहाण होताना पाहिली आहे. त्याच्या जीव धोक्यात असल्याने तो तेथून स्वत:च्या गावी परतला.

हिंदी भाषिक मजुरांचा निषेध :स्थलांतरित मजुरांनी सांगितले की, बिहारी मजुरांना कंपनीत काम मिळत असल्याने तमिळींना रोजगार मिळत नाही. त्यामुळे तमिळ लोक पूर्वीपासूनच हिंदी भाषिकांवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदी भाषिक मजुरांचा विरोध सुरू केला आहे. तामिळनाडू मध्ये बहुतांश कंपन्यांमध्ये फक्त बिहारचे मजूर काम करत आहेत. दुसरीकडे, व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत माहिती विचारली असता, कामगारांनी कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. ते म्हणाला की, कोणीतरी तर मेले आहे परंतू त्याला कोणी मारले आणि व्हिडिओचे सत्य काय आहे, ते माहित नाही. व्हिडिओ पाहून हे लोकही घाबरले आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहून लोक घाबरले :जमुईच्या धाधोर गावात 12 प्रवासी मजूर तामिळनाडूहून परतले आहेत. ज्यामध्ये प्रकाश पासवान, नितीश पासवान, बिक्कू पासवान, विपिन पासवान आणि रणजीत यांचा समावेश आहे. या सर्वांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओ पाहूनच आम्ही तिथून पळ काढला. मात्र अनेकजण अजूनही तिथेच अडकले आहेत. या मजुरांनी बिहार सरकारवर ताशेरे ओढले आणि बिहारमधील कामगार वर्गासाठी रोजगार निर्मितीच्या दिशेने पुढाकार घेतला गेला तरी मजूर इतर राज्यात का स्थलांतरित होतील, असे विचारले. बिहारमधील जवळपास सर्व मजुरांना आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांमध्ये छळाचा सामना करावा लागत आहे.

'10-12 लोकांचा मृत्यू झाला' :स्थलांतरित मजूर मुकेश पासवान म्हणाला की, 'माझ्या ग्रुपची 10 मुले जी तामिळनाडूत 8 वर्षांपासून काम करत होती ती परत आली आहेत. इतर गावांबद्दल बोलायचं झालं तर एकूण 20 लोक परत आले आहेत. आम्ही तिथे गाडी चालवत होतो. आम्ही तिथे राहिलो असतो तर आम्हालाही मारले गेले असते.' आणखी एक प्रवासी मजूर म्हणाला की, आम्ही व्हिडिओत पाहायचो आणि फोनही यायचे की परिस्थिती काय आहे. माझ्या शेजारी असलेल्या धाधोर गावातील पवन यादव या मुलाची तिथे हत्या झाली आहे. आत्तापर्यंत 10-12 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोणी मारले हे माहीत नाही. घटनेच्या वेळी आम्ही तिथे हजर असतो तर आम्हालाही जीव गमवावा लागला असता.'

हेही वाचा :Bombs In Kanpur : होळीपूर्वी घरात सापडले तब्बल 288 बॉम्ब, कानपूर शहरात खळबळ!

ABOUT THE AUTHOR

...view details