मेष : आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृषभ : आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.
मिथुन : आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्या घटनात व्यग्र राहाल.
कर्क :आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तना पासून दूर राहणे हितावह राहील.
सिंह : आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.
कन्या : आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.