बेंगळुरू:कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाटे यांना एमआरटी म्युझिकने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर नोटीस ( High Court issues contempt notice to Rahul Gandhi ) बजावली. ज्यात दावा केला आहे की त्यांनी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले व्हिडीओ काढला नाही. जो नियमांचे उल्लंघन करतो. त्यांच्या व्हिडिओमध्ये केजीएफ चैप्टर-2 चे संगीत वापरले आहे.
उल्लंघन केल्याचा आरोप - मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे आणि न्यायमूर्ती अशोक एस किनगी यांच्या खंडपीठाने एमआरटी म्युझिकने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. कंपनीने आरोप केला आहे की प्रतिवादी 8 नोव्हेंबरच्या आदेशात उच्च न्यायालयाने लादलेल्या अटींचे जाणूनबुजून उल्लंघन करत आहेत.