महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुशील चंद्रा होणार भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, सुनील अरोरा ही जबाबदारी पार पाडत आहेत.

By

Published : Apr 12, 2021, 4:28 PM IST

सुशील चंद्रा
सुशील चंद्रा

नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. या संदर्भातील आदेश कोणत्याही वेळी जारी केला जाण्याची शक्यता आहे. सध्या सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्ताची जबाबदारी पार पाडत आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सर्वात वरिष्ठ आयुक्तांची नेमणूक करण्याच्या परंपरा आहे. चंद्रा 13 एप्रिल रोजी पदभार स्वीकारतील. सध्या, सुनील अरोरा ही जबाबदारी पार पाडत आहेत. चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

सुशील चंद्रा हे 14 मे 2022 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील. चंद्रा यांच्या नेतृत्वात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशात निवडणूक विधानसभा निवडणुका पार पडतील. गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब विधानसभेची मुदत पुढील वर्षी वेगवेगळ्या तारखेला संपणार आहे.

चंद्रा यांची कारकिर्द -

चंद्रा यांचा जन्म 15 मे 1957 चा असून रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ते 1980 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत. त्यांनी आय.आर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच सिंगापूर, आयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा -स्पुतनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details