महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2022, 5:54 PM IST

ETV Bharat / bharat

Himachal Election 2022 : अबब! हिमाचलमधील 68 पैकी चक्क 65 आमदार आहेत करोडपती!

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा सत्ताबदल झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे हिमाचलमधील 68 विजयी उमेदवारांपैकी 65 उमेदवार कोट्यधीश आहेत. विजयी करोडपती उमेदवार कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा. (Winning Candidates Properties in Himachal) (HP Election Winning Candidates)

Etv Bharat
Etv Bharat

शिमला : हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यंदाही येथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसला 68 पैकी 40 जागांवर विजय मिळाला असून भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या आहेत. या निकालाची लक्षणीय बाब म्हणजे काँग्रेसचे सर्व 40 विजयी उमेदवार करोडपती आहेत! त्याचबरोबर भाजपचे 25 पैकी 22 विजयी उमेदवार करोडपती आहेत! याशिवाय हिमाचलमध्ये अपक्ष उमेदवारांनीही तीन जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवारही कोट्यधीश आहेत! (Winning Candidates Properties in Himachal) (MLA Properties in Himachal Pradesh).

काँग्रेसचे सर्व 40 विजयी उमेदवार कोट्यधीश :राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. हिमाचलच्या लोकांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम चालू ठेवली. राज्यातील विधानसभेच्या 68 पैकी 40 जागा काँग्रेसने काबीज केल्या. सर्व 40 विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत. प्रत्येकाकडे करोडोंची मालमत्ता आहे. शिमला ग्रामीण येथील विक्रमादित्य सिंग, नागरोटा येथील आरएस बाली आणि दून येथील राम कुमार पहिल्या तीनमध्ये आहेत. (Congress Winning Candidates Properties in Himachal)

कांग्रेसचे करोडपती आमदारविधानसभा सीटकांग्रेसचे करोडपती आमदारविधानसभा सीटकांग्रेसचे करोडपती आमदारविधानसभा सीट
1 विक्रमादित्य सिंह शिमला ग्रामीण 15 विनय कुमार श्री रेणुका जी 29 जगत सिंह नेगी किन्नौर
2 आरएस बाली नगरोटा 16 नीरज नैय्यर चंबा 30 केवल सिंह पठानिया शाहपूर
3 राम कुमार दून 17 चैतन्य शर्मा गगरेट 31 संजय अवस्थी अर्की
4 राजेंद्र सिंह राणा सुजानपूर 18 सुखविंदर सिंह सुक्खू नादौन 32 नंदलाल रामपुर
5 आशीष बुटेल पालमपूर 19 इंद्र दत्त लखनपाल बडसर 33 सुदर्शन सिंह चिंतपूर्णी
6 भुवनेश्वर गौड़ मनाली 20 धविंद्र कुमार कुटलैहड 34 यादविंदर गोमा जयसिंहपूर
7 सुंदर सिंह ठाकुर कुल्लू 21 विनोद सुल्लतानपुरी कसौली 35 मोहन लाल ब्राक्टा रोहडू
8 भवानी सिंह पठानिया फतेहपूर 22 मुकेश अग्निहोत्री हरोली 36 राजेश धर्माणी घुमारवीं
9 हर्षवर्धन चौहान शिलाई 23 किशोरी लाल बैजनाथ 37 मलेंदर राजन इंदौरा
10 रवि ठाकूर लाहौल स्पीति 24 हरीश जनारथा शिमला शहर 38 अजय सोलंकी नाहन
11 रोहित ठाकूर जुब्बल कोटखाई 25 चंद्र कुमार ज्वाली 39 सुरेश कुमार भोरंज
12 अनिरुद्ध सिंह कसुम्पटी 26 कुलदीप सिंह राठौर ठियोग 40 चंद्र शेखर धर्मपूर
13 कुलदीप सिंह पठानिया भटियात 27 संजय रत्न ज्वालामुखी
14 सुधीर शर्मा धर्मशाळा 28 धनीराम शांडिल सोलन

भाजपचे 22 विजयी उमेदवार कोट्याधीश, 3 लक्षाधीश :हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी भाजपला केवळ 25 जागा जिंकता आल्या आहेत. त्या 25 पैकी 22 विजयी उमेदवार कोट्याधीश असून तीन उमेदवार लक्षाधीश आहेत. चौपालमधून विजयी झालेले बलवीर वर्मा हे सर्व 68 आमदारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहेत. याशिवाय, भाजपचे कोणते विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत आणि कोण लखपती आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील टेबल पहा. (BJP Winning Candidates Properties in Himachal)

भाजपचे करोडपती आमदारविधानसभा सीटभाजपचे करोडपती आमदारविधानसभा सीटभाजपचे करोडपती आमदारविधानसभा सीट
1 बलवीर सिंह वर्मा चौपाल 12 इंद्र सिंह बल्ह 23 लोकेंद्र कुमार आनी
2 अनिल शर्मा मंडी 13 जीत राम कटवाल झंडुता 24 सुरेंद्र शौरी बंजार
3 प्रकाश प्रेम कुमार जोगिंदर नगर 14 त्रिलोक जम्वाल बिलासपूर 25 दलीप ठाकूर सरकाघाट
4 रणबीर सिंह निक्का नुरपूर 15 सत्तपाल सिंह सत्ती ऊना
5 धविंदर सिंह डलहौजी 16 हंसराज चुराह
6 पवन कुमार काजल कांगडा 17 सुखराम चौधरी पांवटा साहिब
7 जयराम ठाकूर सराज 18 विनोद कुमार नाचन
8 रणधीर शर्मा नैना देवी 19 दीप राज करसोग
9 विपिन सिंह परमार सुलह 20 पूर्ण चंद द्रंग
10 जनक राज भरमौर 21 रीना कश्यप पच्छाद
11 राकेश कुमार सुंदरनगर 22 बिक्रम सिंह ठाकूर जसवां परागपूर

विजयी झालेले तीन अपक्षही करोडपती : हिमाचल प्रदेशात 3 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. केएल ठाकूर नालागड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर हमीरपूर मतदारसंघातून आशिष शर्मा आणि देहरा मतदारसंघातून होशियार सिंह यांनी विजय मिळवला आहे. हे तिन्ही उमेदवार करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.

2017 मध्ये इतके आमदार कोट्यधीश होते : ADR नुसार, 2017 मध्ये 68 पैकी 50 आमदार कोट्यधीश होते. 47 पैकी 29 भाजप आमदार आणि 20 काँग्रेस आमदार कोट्यधीश होते. तर एक करोडपती आमदार माकपचा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details