महाराष्ट्र

maharashtra

देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ७६ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मृत्यूदर १.११ टक्क्यांवर

By

Published : May 20, 2021, 1:10 PM IST

गेल्या २४ तासांमध्ये देशात २ लाख ७६ हजार ११० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ५७ लाख, ७२ हजार ४४०वर पोहोचली आहे. चार दिवसांनंतर काल पहिल्यांदाच एका दिवसातील चार हजारांहून कमी मृत्यूंची नोंद करण्यात आली.

COVID-19 India tracker: State-wise report
देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ७६ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मृत्यूदर १.११ टक्क्यांवर

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात २ लाख ७६ हजार ११० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ५७ लाख, ७२ हजार ४४०वर पोहोचली आहे. चार दिवसांनंतर काल पहिल्यांदाच एका दिवसातील चार हजारांहून कमी मृत्यूंची नोंद करण्यात आली.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ३ हजार ८७४ बळींची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण बळींची संख्या २ लाख, ८७ हजार १२२वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या ३१ लाख, २९ हजार ८७८वर पोहोचली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट वाढून ८६.७४ टक्के झाला आहे.

या बळींमध्ये महाराष्ट्रातील ५९४, कर्नाटकातील ४६८, तामिळनाडूचे ३६५, उत्तर प्रदेशचे २८०, दिल्लीमधील २३५, पंजाबमधील २०८ आणि इतर राज्यांमधील रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत ८४ हजार ३४१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ कोटी, २३ लाख, ५५ हजार ४४० वर पोहोचली असून, मृत्यूदर १.११ टक्के असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. ४ मे रोजी भारताने २ कोटी रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर काही दिवसांमध्ये ५७ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात ३२ कोटी नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

राज्यनिहाय कोरोना आकडेवारीसाठी येथे क्लिक करा..

हेही वाचा :कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

ABOUT THE AUTHOR

...view details