महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2023, 3:33 PM IST

ETV Bharat / bharat

Corona XBB. 1.5 variant : कोरोनाचा नवीन प्रकार भारतासाठी धोकादायक आहे का? कशी काळजी घ्यावी ?

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भारतात पाच प्रकरणे आढळली ( Corona New variant of XBB 1 5 ) आहेत. त्याशिवाय XBB. 1.5 कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे समोर आली आहेत. INSACOG ची आकडेवारीसमोर आली आहे.

Corona XBB. 1.5 variant
कोरोनाचा नवीन प्रकार

नवी दिल्ली : कोरोनाच्या XBB.1.5 प्रकाराची 5 प्रकरणे भारतात आढळली ( Corona New variant of XBB 1 5 ) आहेत. त्यामुळे भारतीयांची चिंता वाढली ( Corona New variant In India ) आहे. SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील प्रकरणांमध्ये वाढ होण्यास XBB.1.5 जबाबदार आहे. कोविड-19 च्या प्रकारातील पाच प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. यात पाचपैकी तीन गुजरातमध्ये आहेत. तर कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आढळून आले ( Five cases of new Corona variant in India ) आहे. मंगळवारी INSACOG च्या आकडेवारीनुसार हे जाहीर झाले.

अमेरीकेतमध्ये 44 टक्के प्रकरणे : XBB.1.5 स्ट्रेन ओमिक्रॉन XBB प्रकाराशी संबंधीत आहे. जो ओमिक्रॉन BA.2.10.1 आणि BA.2.75 सबव्हेरियंटचा पुनर्संयोजक आहे. संयुक्तपणे, XBB आणि XBB.1.5 अमेरीकेतमध्ये 44 टक्के प्रकरणे ( 44 percent Corona cases in United States ) आहेत. INSACOG ने म्हटले आहे की, 'XBB' हा संपूर्ण देशात फिरणारा उत्परिवर्तक आहे. कोविड-19 प्रकार Omicron आणि त्याचे उत्परिवर्तक हे भारतातील प्रबळ प्रकार आहेत.

कोरोनाचा नवीन प्रकार :कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराने BF.7 संपूर्ण जगासाठी अडचणीचे कारण बनला आहे. आता या महामारीचा आणखी एक नवीन प्रकार भारतात दाखल झाला आहे. अमेरिकेत कहर करणारा कोरोनाचा आणखी एक प्रकार आता भारतातही दाखल झाला आहे. गुजरातमधील एका व्यक्तीला कोरोनाचा नवीन प्रकार, Omicron XBB.1.5 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर सर्वांच्याच चिंतेत भर पडली ( how to take care of ) आहे.

अमेरिकेत 44 टक्के प्रकरणे : XBB.1.5 हा ओमायक्रॉन BA.2.10.1 आणि BA.2.75 सबव्हेरियंटचा पुनर्संयोजक आहे. त्यानुसार XBB आणि XBB.1.5 ची यूएसमध्ये 44 टक्के प्रकरणे आढळली आहेत. 'XBB' हा संपूर्ण देशात सध्या सर्वात व्हायरल झालेला कोरोनाचा उत्परिवर्तीत आहे. कोविड-19 प्रकार Omicron आणि त्याचे उत्परिवर्तीत हे भारतात सर्वात जास्त आढळत आहेत. असे INSACOG ने म्हटले आहे. INSACOG ने देशभरात SARS-CoV-2 च्या विषांणूची चाचणी केली. त्याचा अहवाल सेंटिनल साइट्स आणि भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांच्या क्रमवारीद्वारे दिला आहे.

XBB.1.5 प्रकार धोकादायक? :तज्ञांच्या मते, XBB.1.5 प्रकार धोकादायक मानला जातो. कारण तो केवळ अँटीबॉडीवर परिणाम करत नाही तर तो शरीराला कमकुवत देखील करतो. अनेक शास्त्रज्ञांनी सांगितल आहे की, XBB सारखे उप-प्रकार कोविड लसीकरणाचा प्रभाव कमी करू शकतात. अशा परिस्थितीत, लसीच्या अकार्यक्षमतेमुळे संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. XXB.1.5 हा प्रकार इतर जुन्या प्रकारांपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. तो सहजपणे मानवी शरीरात प्रवेश करतो आणि पेशींवर हल्ला करून संसर्ग पसरवतो. हा जुना प्रकार XBB किंवा BQ प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरतो.

XBB.1.5 प्रकाराची लक्षणे :शास्त्रज्ञांच्या मते, अमेरिकेत कहर करणार्‍या कोरोनाचे XXB.1.5 प्रकार हे पुनर्संयोजन प्रकार असू शकतात, जे जुन्या XBB विषाणू पेक्षा 96 टक्के वेगवान ( Corona variant XBB 1 5 Symptoms ) आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये कोरोनाच्या या प्रकाराची प्रकरणे पहिल्यांदा नोंदवली गेली होती. दुसरीकडे, लक्षणांबद्दल बोलताना, या प्रकारांमध्ये वेगळे किंवा विशेष लक्षण नाही. XXB.1.5 प्रकारातील काही सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे. शिंकणे, थंडी, खोकला, ताप, डोकेदुखी, वाहते नाक, घसा खवखवणे, कर्कश आवाज यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details