महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 25, 2023, 9:29 AM IST

ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, पराभूत नेत्यांना तिकीट नाकारले

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीसाठी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 124 उमेदवारांचा समावेश आहे.

Congress first list for Karnataka Elections
कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

बेंगळुरू : कर्नाटक काँग्रेसने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेची मुदत 24 मे 2023 रोजी संपत आहे. येथे विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. कर्नाटक राज्यातील शेवटची विधानसभा निवडणूक 2018 मध्ये झाली होती.

पराभूत नेत्यांना तिकीट नाही : यापूर्वी ही यादी या महिन्याच्या 22 तारखेला उगादी उत्सवात जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज शनिवारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर 224 मतदारसंघांपैकी 124 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाच्या बैठकीत निवडणुकीत पराभूत झालेल्या काही नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे कर्नाटककडे विशेष लक्ष : कर्नाटकातील निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे अनेक बलाढ्य नेते सध्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या संदर्भात राज्यात अनेक निवडणूक दौरे केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक जाहीर सभांना संबोधित केले आहे. अलीकडेच ते बेळगाव 'युवक्रांती संवाद' कार्यक्रमात सहभाग झाली होते. तसेच राहुल गांधींनी वायनाडमध्ये खासदारांचीही भेट घेतली होती. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बेळगाव येथील युवाक्रांती कार्यक्रमात भाग घेतला होता. पक्षाने येथे तीन निवडणूक आश्वासने जाहीर केले आहेत.

हे ही वाचा :Rahul Gandhi Disqualified : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लढत राहणार', तर प्रियंका गांधीही आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details