महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2021, 1:57 PM IST

Updated : Jan 12, 2021, 2:24 PM IST

ETV Bharat / bharat

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा उपचारांना प्रतिसाद; गरज भासल्यास हृदयरोग तज्ज्ञांना बोलावणार

अपघातग्रस्त आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्बेत स्थीर आहे. उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. ते अतिदक्षता विभागात असून हृदविकार तज्ञांचा चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले असून गोमेकॉच्या डॉक्टरांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवण्यात येणार आहे.

गोवा मुख्यमंत्री
गोवा मुख्यमंत्री

पणजी :अपघातग्रस्त आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्बेत स्थीर आहे. उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. ते अतिदक्षता विभागात असून हृदविकार तज्ञांचा चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या डॉक्टरांना यशस्वी उपचार करण्याचा विश्वास आहे. परंतु, त्यांनी जर बाहेरील हृदयविकार तज्ञ बोलावण्याची शिफारस केली तर त्यांना बोलावण्यात येईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले असून गोमेकॉच्या डॉक्टरांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवण्यात येणार आहे.

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा उपचारांना प्रतिसाद

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू -

कर्नाटकात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. आता थोड्यावेळापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

हाडांवर शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर -

डॉ. सावंत म्हणाले, नाईक यांच्यावर हाडांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची तब्येत स्थीर आहे. ते अतिदक्षता विभागात असून गोमेकॉच्या हृदयविकार विभागाच्या तज्ज्ञांचा चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी जर बाहेरील तज्ज्ञाला बोलावण्याची शिफारस केली तर त्यांना येथेच बोलावण्यात येईल, असे सावंत म्हणाले.

रात्री सुरू झालेली शस्त्रक्रिया सकाळपर्यंत चालली -

डॉ. बांदेकर म्हणाले, सोमवारी जेव्हा नाईक यांना कर्नाटकातून गोव्यात आणले जात होते तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. रक्तदाब 60 इतका खाली आला होता. आम्ही त्यांना तत्काळ बूस्ट देत तो 100 पर्यंत नेला आणि गोमेकॉत येताच रक्तही चढवले. त्यानंतर रात्री दोन वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली, जी सकाळी साडेसात वाजता संपली. त्यानंतर नाईक यांनी प्रतिसाद दिला. आता त्यांना चालण्या फिरण्यास त्रास होणार नाही. तसेच रक्तस्राव होणार नाही. दक्षता म्हणून यांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अन्य दोन जखमींना गोव्यात आणले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 12, 2021, 2:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details