नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये महामारी पसरली आहे. या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सोशल मीडिया जायंट व्हॉट्सअॅपची मदत घेतली आहे. डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना व्हॉट्सअॅपच्या मदतीने नागरिकांना हेल्थ अलर्ट पाठवत आहे. या सुविधेद्वारे तब्बल दिडशे कोटी नागरिकांना कोरोनाबाबतची अधिकृत माहिती मिळणार आहे.
कोरोना जगभरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अनेक प्रकारची खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरत आहे. त्यातून नागरिकांध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरत असून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खरी माहिती मिळावी म्हणून डब्ल्यूएचओने व्हॉट्सअॅपची मदत घेतली आहे.