महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2019, 12:02 PM IST

ETV Bharat / bharat

अयोध्या वादावर २ ऑगस्टपासून सुनावणी - सर्वोच्च न्यायालय

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायालयाच्या पीठाने मध्यस्थी समितीने त्यांच्यी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर २५ जुलैपासून या खटल्यावर रोज सुनावणी होईल, असे म्हटले होते.

राम मंदिर निर्माण

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मध्यस्थी समितीला ३१ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. २ ऑगस्टला या प्रकरणी खुल्या न्यायालयात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याआधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायालयाच्या पीठाने मध्यस्थी समितीने त्यांच्यी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर २५ जुलैपासून या खटल्यावर रोज सुनावणी होईल, असे म्हटले होते. ११ जुलैला मुद्द्यावरील अहवालाची मागणी करण्यात आली होती.

पीठाने तीन सदस्यीय मध्यस्थी समितीचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (सेवानिवृत्त) एफ. एम. आय कलीफुल्ला यांना आतापर्यंत झालेल्या प्रगती आणि सद्यस्थितीविषयी १८ जुलैपर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी, असे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details