महाराष्ट्र

maharashtra

'या' कुटुंबात नागपंचमीला घरीच होते नागांची पुजा

By

Published : Aug 6, 2019, 8:05 PM IST

श्रावणातील पहिल्या पंचमीला हिंदू लोक मंदिरांमध्ये जाऊन किंवा गारूड्यांकडे जाऊन नागपंचमीचा सण साजरा करतात. कर्नाटकमधील एक कुटुंब मात्र घरीच जीवंत नागांची पुजा करते.

कर्नाटकमधील एक कुटुंब नागपंचमीला घरीच जिवंत नागांची पुजा करते

शिर्सी(कर्नाटक) - हिंदू धर्मीय लोक दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण साजरा करतात. सामान्यपणे, मंदिरांमध्ये जाऊन किंवा गारूड्यांकडे जाऊन नागाची पुजा केली जाते. मात्र, कर्नाटकमधील शिर्सी जिल्ह्यात एक कुटुंब दरवर्षी घरातच जीवंत नागांची पुजा करते.

कर्नाटकमधील एक कुटुंब नागपंचमीला घरीच जिवंत नागांची पुजा करते.
प्रशांत हुलेकल यांच्याकडे मागील ३५ वर्षांपासून नाग आहेत. संपूर्ण कुटुंब या नागांची घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेते. दरवर्षी नागपंचमीच्या सणाला दूध आणि गोडाचा नैवेद्य दाखवून या नागांची पुजा केली जाते. हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागांची देवता म्हणून पुजा करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details