महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2020, 3:21 PM IST

Updated : Mar 4, 2020, 5:41 PM IST

ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष - बॅडमिंटनच्या क्षितिजावर एक चमकता तारा पी. व्ही. सिंधू, जाणून घ्या या सुवर्णकन्येविषयी

बॅडमिंटनच्या क्षितिजावर एक चमकता तारा पी. व्ही. सिंधू म्हणजेच पुरसला वेंकट सिंधू होय. सिंधूचा जन्म 5 जुलै 1995 मध्ये गुंटूरमध्ये झाला. सिंधूच्या वडिलांचे रामण्णा तर आईचे नाव विजयालक्ष्मी आहे. सिंधूला खेळाचा वारसा घरातूनच लाभला आहे. तिचे वडील रामण्णा हे व्हॉलिबॉलपटू होते. सिंधूच्या उंचावत जाणाऱ्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी 2015 मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री तर 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच 2016 मध्ये तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील सिंधूची कामगिरी लक्षात घेता आणखी ऑलिम्पिक व जागतिक पदके तिच्या नावावर आली तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही.

बॅडमिंटन च्या क्षितिजावर एक चमकता तारा. पी. व्ही. सिंधु
बॅडमिंटन च्या क्षितिजावर एक चमकता तारा. पी. व्ही. सिंधु

हैदराबाद -भारतीय बॅडमिंटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सिंधूबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचा चाहतावर्ग नेहमीच आतूर असतो. महिला दिनाच्या निमित्ताने आपण सिंधूबद्दल जाणून घेणार आहोत.

बॅडमिंटनच्या क्षितिजावर एक चमकता तारा पी. व्ही. सिंधू

बॅडमिंटनच्या क्षितिजावर एक चमकता तारा पी. व्ही. सिंधू म्हणजेच पुरसला वेंकट सिंधू होय. तिचा जन्म 5 जुलै 1995 मध्ये गुंटूरमध्ये झाला. सिंधूच्या वडिलांचे नाव रामण्णा तर आईचे नाव विजयालक्ष्मी आहे. सिंधूला खेळाचा वारसा घरातूनच लाभला आहे. तिचे वडील रामण्णा हे व्हॉलिबॉलपटू होते. त्यांनी मैदानातील चमकदार कामगिरीच्या जोरावर अर्जून पुरस्कारही मिळवला आहे. वडील व्हॉलिबॉल खेळत असले तरी गोपीचंद यांच्या खेळाने प्रभावित झाल्यामुळे सिंधूने बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतला. वयाच्या आठव्या वर्षांपासून बॅडमिंटनच्या कोर्टवर घाम गाळल्यामुळेच तिने जगातील सर्वोत्तम खेळाडूच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

जाणून घ्या या सुवर्णकन्ये विषयी

तिने हैदराबादमध्ये पी. गोपीचंद यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले. २०१२ मध्ये जागतिक क्रमवारीत तिने अव्वल २० मध्ये स्थान मिळवले. २०१३ ला सिंधूने बॅडमिंटन कोर्टवर ऐतिहासिक कामगिरी केली. तर २०१६ च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तर ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तसेच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक सिंधूने आपल्या आईला समर्पित केले आहे.

बॅडमिंटन च्या क्षितिजावर एक चमकता तारा. पी. व्ही. सिंधु

सिंधूच्या उंचावत जाणाऱ्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी २०१५ मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री तर 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच 2016 मध्ये तीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील सिंधूची कामगिरी लक्षात घेता आणखी ऑलिम्पिक व जागतिक पदके तिच्या नावावर आली तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही.

'फोर्ब्ज'ने अलीकडेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सिंधू तेराव्या स्थानी आहे. या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Last Updated : Mar 4, 2020, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details