महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2019, 9:08 PM IST

ETV Bharat / bharat

डेरा बाबा नानक येथून कॉरिडॉरपर्यंत बससेवा सुरू, पंजाब सरकारचा निर्णय

गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथून कॉरिडॉरच्या प्रवेशद्वारापर्यंत पंजाब सरकारकडून बससेवा सुरु करण्यात आली आहे.

कॉरिडॉर

नवी दिल्ली - शीख धर्मियांचे पवित्र स्थळ असलेले कर्तारपूर साहिब म्हणजेच गुरु नानक देव गुरुद्वारा भारतीयांसाठी खुला झाला आहे. भाविकांना कॉरिडॉरकडे जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथून कॉरिडॉरच्या प्रवेशद्वारापर्यंत पंजाब सरकारकडून बससेवा सुरू करण्यात आली आहे.


संबधीत बस सेवा शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस डेरा बाबा नानक जवळील स्थानकावरून सकाळी 08:45 वाजता सुटेल आणि कॉरिडॉरच्या प्रवेश द्वारावर 9 वाजता पोहोचेल. त्यांतर सायंकाळी 5:15 वाजता कॉरिडॉरवरून परत स्थानकावर पोहोचेल, अशी माहिती पंजाबच्या परिवहन मंत्री रजिया सुल्ताना यांनी दिली.


गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंती पूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये करार झाला आहे. या करारानुसार ५ हजार भारतीयांना दररोज विना व्हिजा कर्तापरपूर साहीब गुरुद्वारामध्ये माथा टेकवण्यासाठी जाता येणार आहे. शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. पाकिस्तानच्या हद्दीत आहे. या ठिकाणी गुरुनानक यांनी १८ वर्षे वास्तव्य केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details