महाराष्ट्र

maharashtra

दारु विक्रीवरील कर वाढीनंतर दिल्ली सरकारने पेट्रोल, डिझेलवरील VAT वाढवला

By

Published : May 5, 2020, 1:15 PM IST

पेट्रोलवरील २७ टक्के मुल्यवर्धित कर वाढवून ३० टक्के तर डिझेलवर १६.७५ टक्के असलेला कर ३० टक्के करण्यात आला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किमतीत १ रुपया ६७ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ७ रुपये १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने मुल्यवर्धित करात वाढ केल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या असतानाही दिल्ली सरकारने दरात वाढ केली आहे.

दिल्लीत लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. नव्या किंमतीनुसार आज ५ मेपासून दिल्लीत डिझेल ६९ रुपये २९ पैसे लिटर तर पेट्रोल ७१ रुपये २६ पैशांवर पोहचले आहे.

हेही वाचा -दिल्लीत स्पेशल 'कोरोना फी'; तळीरामांच्या खिशाला कात्री

पेट्रोलवरील २७ टक्के मुल्यवर्धित कर वाढवून ३० टक्के तर डिझेलवर १६.७५ टक्के असलेला कर ३० टक्के करण्यात आला आहे. लॉकडाऊनअसल्यामुळे महसुलात वाढ करण्यासाठी दिल्ली सरकार पर्याय शोधत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

दारु विक्रीवरही अतिरिक्त भार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दारू विक्रीवर थेट ७० टक्के अतिरिक्त कर लावला आहे. हा कर MRP म्हणजेच कमाल विक्री किंमतीवर आकारण्यात येणार आहे. यामुळे पिण्याची हौस भागवणाऱ्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. या निर्णयानंतर कोरोनामुळे बुडलेला महसूल तसेच आर्थिक नुकसान भरून निघणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details