महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 20, 2020, 8:24 AM IST

ETV Bharat / bharat

आग्रा बस अपहरण : पोलीस आणि आरोपींमध्ये चेकनाक्यावर चकमक, एकजण जखमी

आग्र्यात बुधवारी एका बसचे अपहरण करण्यात आले होते. यावेळी फतेहबाद ते फिरोजाबाद रस्त्यादरम्यान चेकनाक्यावर आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. यावेळी एका आरोपीच्या पायाला गोळी लागली असून एकजण फरार झालाय.

encounters in uttarpradesh
फतेहबाद ते फिरोजाबाद रस्त्यादरम्यान चेकनाक्यावर आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली.

उत्तर प्रदेश -आग्र्यात बुधवारी एका बसचे अपहरण करण्यात आले होते. यावेळी फतेहबाद ते फिरोजाबाद रस्त्यादरम्यान चेकनाक्यावर आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. यावेळी एका आरोपीच्या पायाला गोळी लागली असून एकजण फरार झालाय. जखमी आरोपीचे नाव प्रदिप गुप्ता असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हे शाखेने तपासाची सुत्रे हातात घेतली आहेत.

आग्रा बस अपहरण : पोलीस आणि आरोपींमध्ये चेकनाक्यावर चकमक, एकजण फरार
एकजण फरार झाल्यानंतर तपासाची चक्रे गतीने फिरवली जात असून पुढील तपास आग्रा पोलीस करत आहेत.मलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू दक्षिणी बायपास रस्त्यावर काल एक बसचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस आणि अपहरणकर्त्यांमध्ये वाटाघाटी चालू होत्या. संबंधित चकमक फतेहबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच...)

ABOUT THE AUTHOR

...view details