महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देशातील 'हे' दिग्गज नेते रांगेत

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यासाठी देशभरातून विविध पक्षांचे दिग्गज नेते नामांकन पत्र दाखल करत आहेत.

By

Published : Mar 25, 2019, 2:03 PM IST

हेमा मालिनी, हरिष रावत आणि जीतनराम मांझी

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आज नामांकन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी देशभरातील दिग्गज नेते निवडणूक आयोगाच्या स्थानिक कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यापूर्वी अनेक नेते निवडणूक जिंकण्यासाठी देवाला साकडे घालत आहेत. तर काही नेते आयोगाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह पोहोचत आहेत.

नामांकन पत्र दाखल करण्यासाठी देशभरातील दिग्गज नेते निघाले आहेत. या नेत्यांमध्ये उत्तर भारतातील नेत्यांचा आढावा घेऊ..

जम्मू काश्मीर-

नॅशनल कॉन्फन्स-काँग्रेसचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नामांकन पत्र दाखल केले आहे. त्यांच्यासोबत पुत्र ओमार अब्दुल्लाह आणि समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी बाँके बिहारी मंदिरात देवाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

बिहार -

बिहारमध्ये स्थानिक पक्षांनी भाजप आणि नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडच्या आघाडी विरोधात महाआघाडी केली आहे. त्यामधील बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे गया मतदारसंघातून नामांकन पत्र दाखल करणार आहेत. जमुईमधून लोक जनशक्ती पक्षाचे नेते आमि रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान नामांकन पत्र दाखल करतील. तर नवादा येथून राष्ट्रीय जनता दलाच्या वरिष्ठ नेत्या विभा देवी नामांकन पत्र भरणार आहेत.

महाराष्ट्र -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र भरत आहेत. नामांकण अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी समर्थकांसोबत मिरवणूक काढली होती. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर करणार आहेत.

उत्तराखंड -

उत्तराखंडच्या नैनिताल लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपचे प्रदेश अध्यक्ष अजय भट आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details