महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 25, 2019, 9:09 PM IST

ETV Bharat / bharat

प्रेरणादायी यश..! नरेंद्र मोदींनी केला पी. व्ही. सिंधूवर कौतुकाचा वर्षाव

भारताची स्टार खेळाडू पी. व्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. त्यानंतर, तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करत, पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे.

BWF World Championship

नवी दिल्ली - भारताची स्टार खेळाडू पी. व्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकत इतिहास रचला. तिने अंतिम सामन्यात जपानची खेळाडू नाओमी ओकुहाराचा पराभव केला. त्यानंतर, तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करत, पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे.

पी. व्ही. सिंधूचा देशाला अभिमान वाटत आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे बॅडमिंडनप्रती असलेले समर्पण हे नक्कीच प्रेरणादायी आहे. पी. व्ही. सिंधूचे यश हे अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले आहे.

भारतीय बॅडमिंटन इतिहासात, जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकणारी सिंधू ही पहिलीच खेळाडू आहे. यापूर्वी, सायना नेहवालने २०१५ आणि २०१७ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तर, पुरुष गटात प्रकाश पादुकोण यांनी १९८३ साली आणि साई प्रणीय याने २०१९ मध्ये कांस्य पदक मिळवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details