महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तब्बल ११ वेळा निवडणूक जिंकणाऱ्या 'या' काँग्रेस नेत्याचा प्रथमच पराभव

तब्बल ११ वेळा निवडणूक जिंकणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे.

By

Published : May 25, 2019, 1:18 PM IST

'या' काँग्रेस नेत्याचा प्रथमच पराभव

नवी दिल्ली - तब्बल ११ वेळा निवडणूक जिंकणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चिच असेच समीकरण असते. मात्र, यावेळी त्यांना विजय मिळवता आला नाही. खरगे हे सलग ९ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिले आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार उमेश जाधव यांनी निवडणूक लढवली आहे. जाधव यांनी ९५ हजार ४५२ मतांनी खरगे यांचा पराभव केला. खरगे यांनी केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. २०१४ मध्ये ते याच मतदार संघातून विजयी झाले होते. कर्नाटकच्या राजकारणात खरगे यांना दलित नेते म्हणून पाहिले जाते. यावेळी मात्र, कर्नाटकमध्ये काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. भाजपने कर्नाटकमधील २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवला.

ABOUT THE AUTHOR

...view details