महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2020, 7:53 PM IST

ETV Bharat / bharat

श्रीकृष्ण जन्मभूमी खटला : याचिकाकर्ते जाणार जिल्हा न्यायालयात

मागील आठवड्यात काही लोकांनी श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेली सतराव्या शतकातील ईदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मथुरा दिवाणी कोर्टाने शाही ईदगाह मशीद ही कृष्णाजन्मभूमीवर बांधण्यात आल्याच्या दावा फेटाळून लावल्यानंतर याचिकाकर्त्यांनी जिल्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी खटला
श्रीकृष्ण जन्मभूमी खटला

मथुरा -मथुरा दिवाणी कोर्टाने शाही ईदगाह मशीद हे कृष्णा जन्मभूमीवर बांधल्याच्या दावा फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यांनी जिल्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.

मथुरेतील कृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जागेची मालकी मिळण्याची आणि शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकेद्वारा करण्यात आली होती. कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्ती रंजना अग्निहोत्री आणि इतर पाच जणांनी ही याचिका दाखल केली होती.

श्रीकृष्णा जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यात झालेल्या जमीन कराराला मान्यता देणार्‍या पूर्वीच्या मथुरा कोर्टाच्या निर्णय रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, मथुरा येथील वरिष्ठ विभाग प्रभारी दिवाणी न्यायाधीश छाया शर्मा यांनी ३० सप्टेंबर रोजी ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर, आम्ही लवकरच जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करू, असे फिर्यादी यांचे वकील हरिशंकर जैन यांनी शनिवारी सांगितले. हा निकाल अनेक तथ्य आणि कायद्याविरुद्ध असल्याने मथुरा जिल्हा न्यायालयासमोर तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले.

काय आहे वाद

याचिकेत म्हटले होते, १९६८मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ (सध्याचा श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान) आणि शाही इदगाह मशीद यांच्यात जमिनीसंदर्भात करार झाला होता. यामध्ये निश्चित करण्यात आले होते की, जेवढ्या जागेत मशीद बांधण्यात आली आहे, तेवढ्याच जागेवर कायम राहील. १९६८मध्ये मथुरा न्यायालयाने दिलेला हा करार रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. जमीन मंदिर ट्रस्टकडे सोपवण्याची मागणीही करण्यात आली होती. मागील आठवड्यात काही लोकांनी कृष्णाच्या जन्मस्थानी असलेली सतराव्या शतकातील ईदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मंदिराची १३ एकर जागा ही केशव देव मंदिराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मथुरा कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा -हाथरस प्रकरण : आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी महिला सरपंचाचे बेमुदत उपोषण

ABOUT THE AUTHOR

...view details