महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 5:07 PM IST

ETV Bharat / bharat

कोरोना चाचणी आता होणार 'मोबाईल लॅब'मध्ये..

'आत्मनिर्भर भारत' घोषणेच्या पार्श्वभूमीवर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच 'आंध्र प्रदेश मेड-टेक झोन' यांनी संयुक्तपणे ही प्रयोगशाळा बनवली आहे. ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची फिरती प्रयोगशाळा आहे. फेब्रुवारीमध्ये देशात केवळ एकाच प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची चाचणी घेणे शक्य होते. आता या फिरत्या प्रयोगशाळेमुळे, देशाच्या अगदी दुर्गम भागामध्येही पोहोचून आपण कोरोना चाचणी करू शकतो, असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

Harsh Vardhan launches India's first mobile laboratory for COVID-19 testing
कोरोना चाचणी आता होणार 'मोबाईल लॅब'मध्ये..

नवी दिल्ली -केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी कोविड-१९ चाचणी करणाऱ्या देशातील पहिल्या 'मोबाईल लॅब'चे अनावरण केले. या फिरत्या प्रयोगशाळेमुळे देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागामधील लोकांची कोरोना चाचणी करण्यास मदत होणार आहे, असे हर्षवर्धन यावेळी म्हटले.

'आत्मनिर्भर भारत' घोषणेच्या पार्श्वभूमीवर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच 'आंध्र प्रदेश मेड-टेक झोन' यांनी संयुक्तपणे ही प्रयोगशाळा बनवली आहे. ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची फिरती प्रयोगशाळा आहे.

या प्रयोगशाळेमध्ये दिवसाला २५ आरटी-पीसीआर चाचण्या होऊ शकतात. यासोबतच, ३०० एलिसा (ELISA) चाचण्या आणि सोबतच टीबी, एचआयव्ही यांसारख्या इतर चाचण्याही होऊ शकतात. फेब्रुवारीमध्ये देशात केवळ एकाच प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची चाचणी घेणे शक्य होते. आता आपल्याकडे देशभरात एकूण ९५३ कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. यांपैकी ६९९ प्रयोगशाळा सरकारी आहेत. तसेच आता या फिरत्या प्रयोगशाळेमुळे, देशाच्या अगदी दुर्गम भागामध्येही पोहोचून आपण कोरोना चाचणी करू शकतो असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

गेल्या २४ तासांमध्ये देशात एका दिवसातील सर्वाधिक (१२,८८१) रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,६६,९४२वर पोहोचली आहे.

हेही वाचा :भारत चीनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details