महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2019, 8:16 AM IST

Updated : Nov 9, 2019, 12:35 PM IST

ETV Bharat / bharat

अयोध्या निकाल: वादग्रस्त जागा केंद्राच्या ट्रस्टला; तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत मिळणार पर्यायी जागा

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) आपला निकाल जाहीर केला.यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले.

LIVE : अयोध्या प्रकरण : आज जाहीर होणार निकाल!

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) आपला निकाल जाहीर केला.यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले.

11.09 AM - केंद्र सरकारने राम मंदिर बांधण्यासाठी ३ ते ४ महिन्याच्या आत एका ट्रस्टची स्थापना करावी.

  • ट्र्स्टच्या कामकाजासाठी सरकारने मार्गदर्शन करावे, त्यात मंदिर बांधण्याचाही समावेश राहिल.
  • या ट्रस्टला वादग्रस्त वास्तूच्या आतिल आणि बाहेरील ढाच्याची मालकी या ट्रस्टला देण्यात येईल.
  • सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत ५ एकर जागा देण्याचे निर्देश.
  • ही जागा केंद्र किंवा राज्य सरकारकडून देण्यात येणार

11.08 AM - मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पर्यायी जागा मिळेल

11.05 AM - 1857 पूर्वी वादग्रस्त भूमीवर कोणाची मालकी होती, याबाबत मुस्लीम पक्षकारांकडून पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

11.00 AM वादग्रस्त जागेची मालकी आणि केवळ नमाज पठणाचे पुरावे नाहीत.

11.00 AM - मुंबईत उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत १४४ कलम लागू

10.59 AM - पुणे जिल्ह्यातील शाळांना तातडीने सुट्टी जाहीर

10.54 AM - प्रत्येक शुक्रवारी मशीद परिसरात मुस्लीम समाजबांधव नमाज पठण करत होते, याचे पुरावे उपलब्ध

10.50 AM - चौथरा व सीतेची रसोई मान्य

10.50 AM - अयोध्येत रामाचा जन्म झाला ही हिंदूची आस्था

10.49 AM - जमिनीच्या मालकीवर मार्गदर्शक तत्वानुसार निर्णय घेतला जाईल

10.48 AM - वादग्रस्त जागेवर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक पूजा करत होते.

10.48 AM - अयोध्येत रामाचा जन्म झाला यावर कोणताही वाद नाही

10.45 AM - मशिदीच्या पायावरून त्या ठिकाणी हिंदू मंदिर होते हे स्पष्ट होत नाही, पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार

10.45 AM - पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

10.45 AM - मशीद ज्या ठिकाणी बांधली त्या ठिकाणच्या पायाची रचना दुसऱ्या पद्धतीची, त्यावरच मशीद उभारली.

10.36 AM - मशिदीचा पाया इस्लामिक पद्धतीचा नव्हता.., मशीद रिकाम्या जागेवर बांधलेली नाही.

10.35 AM - भाविकांचीश्रद्धा आणि भावना विचारता घेणे महत्वाचे, यासाठी न्यायालय समतोल राखणार

10.33 AM - निरमोही आखाड्याचा दावा फेटाळला

10.30 AM - शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली,

  • १९४६ फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आवाहन देणारी शिया वक्फ बोर्टाची याचिका फेटाळली.
  • न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी फेटाळली याचिका

10.30 AM - अयोध्येच्या वादग्रस्त भूमी प्रकरणातील खटल्याचा निकाल वाचणास आज १०.३० वाजता सुरुवात झाली

10.15 AM - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्च स्तरीय सुरक्षा बैठक; एनएसए प्रमुख अजित डोवाल यांचीही उपस्थिती

10.12 AM - सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायालयात दाखल

10.00 AM - अयोध्या भूमी वाद प्रकरणाचा निकाल वाचण्यास थोड्याच वेळात होणार सुरुवात

9.50 AM - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपली हजारो वर्षापासून सुरू असलेली पंरपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येच्या वादग्रस्त भूमी प्रकरणाचा निकाल आज येणार आहे. यावर न्यायालय जो निकाल देईल त्यावरून देशातील एकता सामाजिक सद्भाव आणि एकमेकांतील प्रेम कायम राहिल याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

9.45 -AM अयोध्या वाद प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश गोगाई यांच्या कोर्टाबाहेर वकिलांची गर्दी; ५ न्यायाधिशांचे बेच आज १०.३० वाजता देणार निकाल

9.30 AM - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची बोलावली बैठक; शाहांच्या घरी होणार चर्चा.

9.15AM - राजस्थान - जयपूरमध्ये सकाळी १० वाजल्यानंतर पुढील २४ तासासाठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात येणार.

9.10 AM - कर्नाटकमध्ये कलम १४४ लागू. हुबळी आणि धारवाडमध्ये दारू विक्रीला बंदी

9.05 AM - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायायल जो निकाल देईल त्याचा स्वीकार करा, शांतता कायम राखा - नवीन पटनाईक - मुख्यमंत्री ओडिशा

9.00 AM - श्रीराम लल्ला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा मज्जाव नाही. अयोध्येतील सर्व बाजारपेठा सुरू आहेत. येथील परिस्थिती सर्वसामान्य - उत्तर प्रदेश पोलीस

8.45 AM - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय परिसरात कलम १४४ लागू

8.30 AM - अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालावर संरसंघचालक मोहन भागवत दुपारी १ वाजता घेणार पत्रकार परिषद

8.15 AM - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तसेच या निकालासंदर्भात समाज माधम्यांवर अफवा न पसरवण्याचे आवाहनही केली आहे - यूपी पोलीस महानिदेशक

8.10 AM - आम्हाला आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येईल तो स्वीकारा आणि शांतता राखा, केद्रींय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन.

8.06 AM- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. अयोध्येच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जो काही निकाल येईल, तो कुणाचा विजय किंवा पराभव नसेल,असेही त्यांनी म्हटले आहे.

8.05 AM - अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्थेत वाढ

हेही वाचा - VIDEO: पाहा काय आहे 'अयोध्या टायटल सूट' विवाद

हेही वाचा - अयोध्या विवाद : जाणून घ्या, काय आहे पार्श्वभूमी आणि घटनाक्रम

१७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच याप्रकरणी निकाल जाहीर होणार याची सर्वांना खात्री होती. त्या पार्श्वभूमीवर देशभरात राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. उत्तर प्रदेश, अयोध्या या ठिकाणी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समाज माध्यमावरही सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असणार आहे.

Last Updated : Nov 9, 2019, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details