महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 7, 2019, 6:36 PM IST

ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेश वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, हेल्मेट न घातल्यामुळे रिक्षाचालकाला दंड

रिक्षा चालक कसे हेल्मेट घालणार? हेल्मेट न घातल्यामुळं दंड होईल, असा विचारही रिक्षाचालकाच्या ध्यानीमनी आला नसेल.

रिक्षाचालकाला दंड

अमरावती - नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना आता अधिकचा दंड भरावा लागत आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास आता वाहन चालकाला तब्बल हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे. मात्र, आता रिक्षा चालकालाही सरकारने हेल्मेट बंधनकारक केले की काय? अशी घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. विजयवाडा वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालवताना हेल्मेट घातले नाही म्हणून चक्क एका रिक्षाचालकाला दंड केला आहे.

हेल्मेट न घातल्यामुळे रिक्षाचालकाला दंड

रिक्षा चालक कसे हेल्मेट घालणार? हेल्मेट न घातल्यामुळं दंड होईल, असा विचारही रिक्षाचालकाच्या ध्यानीमनी आला नसेल. कदाचित नव्या नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांची धांदल उडाली असावी, म्हणून त्यांनी रिक्षाचालकालाच दंड ठोठावला. ही घटना कृष्णा जिल्ह्यातच्या विजयवाडा शहरात घडली. १६ टीएस ८५९७ या क्रमांकाच्या रिक्षाला पोलिसांनी दंड ठोठावण्याचा प्रताप केला.

हेल्मट न घातल्यामुळे दंड केल्याचा संदेश मोबाईलवर पाहून रिक्षा चालकाला धक्काच बसला. वाहन चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे तुम्हाला दंड ठोठावत असल्याचे या संदेशात म्हटलं आहे. मात्र, ही तांत्रिक चूक असल्याचे म्हणत पोलिसांनी या प्रकरणावर पांघरून घालण्यात प्रयत्न केला.

ABOUT THE AUTHOR

...view details