महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 9:00 PM IST

ETV Bharat / bharat

Messaging App Sold : किशन बगरियानं मेसेजिंग ॲप 416 कोटींना विकलं

Word Press.com साठी प्रसिद्ध असलेल्या Automattic Inc चे संस्थापक मॅट मुलेनवेग यांनी Texts.com मेसेजिंग ॲप विकत घेतलं आहे. हे ॲप आसाममधील दिब्रुगढ येथील किशन बगरिया या तरुणांना तयार केलं होतं. किशन बगरियाकडून तब्बल 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये Automattic Inc या कंपनीनं हे ॲप विकत घेतलंय.

Kishan Bagaria
किशन बगरिया

दिब्रुगढ :आसाममधील एक मुलगा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळं सध्या चर्चेत आहे. आसामच्या दिब्रुगडमधील या तरुणानं तयार केलेलं ॲप तब्बल 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकण्यात आलं आहे. किशन बगरिया असं या तरुणाचं नाव आहे. तो आसामधील दिब्रुगडच्या चरियाली पोलीस स्टेशन परिसरात राहतो.

416 कोटी रुपये विकलं ॲप :व्यापारी महेंद्र बगरिया तसंच नमिता बगरिया यांचा किशन मुलगा आहे. त्यांच कुटुंब दिब्रुगड येथील चरियाली पोलीस स्टेशन भागात वास्तव्यास आहे. आसाममधील किशन बगरिया या मुलासोबत जागतिक दिग्गज ऑटोमॅटिकनं US$ 50 दशलक्ष किमतीचा करार केला आहे. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 416 कोटी रुपये आहे. कंपनीनं केवळ किशनचं अॅप विकत घेतलेलं नाही, तर किशनला 'Texts.com' या वेबसाईटच्या ऑपरेशनची जबाबदारी घेण्यासही सांगितलं आहे.

दिब्रुगडला किशन किशनचं जोरदार स्वागत : बगारिया यांनी तयार केलेले, Text.com हे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स Instagram, Twitter, Messenger, WhatsApp इत्यादी सारख्याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आलं आहे. या यशानंतर किशन बगरिया तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर अमेरिकेतून आसाममधील दिब्रुगडला पोहोचलाय. दिब्रुगडमधील मोहनबारी विमानतळावर किशनच्या कुटुंबीयांनी, तसंच त्याच्या मित्रांनी जोरदार स्वागत केलंय.

कमी वयात गाठलं यश : अमेरिकेतून बुधवारी दिब्रुगढमध्ये आलेले किशन बगरियानं माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनं काम करताना आलेल्या अडचणी सांगितल्या. त्यानं अथक प्रयत्नानंतर यशाचा पल्ला गाठल्याचं म्हटलंय. या यशात आई-विडिलांचा मोठा वाटा असल्याचं त्यानं माध्यमांना सांगितलंय. यावेळी किशन वडील महेंद्र बगरिया यांनी सांगितलं की, तो लहानपणापासूनच या कामात आघाडीवर होता. त्यानं त्याच्या मेहनतीवर आकाशाला गवासणी घातली आहे. आमच्या मुलाचा आम्हला अभिमान असल्याचं त्याच्या वडिलांनी बोलताना म्हटलंय. किशन बगरिया या युवकांना तयार केलेल्या Text.com ॲप्सद्वारे जगभरातील तरुणाचं लक्ष आपल्याकडं वेधलं आहे. कमी वयात त्यानं केलेलेल्या चमकदार कामगिरीमुळं संपूर्ण कुटुंबासह देशाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळं युवकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details