महाराष्ट्र

maharashtra

Anti Child Marriage Drive: बालविवाहाच्या विरोधात आसाममध्ये मोठी कारवाई, अटकेच्या भीतीने महिलेची आत्महत्या

By

Published : Feb 4, 2023, 5:40 PM IST

आसाममध्ये बालविवाहाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असताना एका महिलेने आत्महत्या केली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. आई-वडिलांना अटक होण्याची भीती तिला वाटत होती. एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी लग्न झालेल्या मुलींचे काय होणार असा सवाल उपस्थित केला आहे.

Adverse impact of anti-child marriage drive
बालविवाहाच्या विरोधात आसाममध्ये मोठी कारवाई.. अटकेच्या भीतीने महिलेने केली आत्महत्या

गुवाहाटी : आसाममध्ये दोन दिवसांपासून बालविवाहाविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. मनकाचार जिल्ह्यात एका 22 वर्षीय महिलेने बालविवाहात अडकलेल्या पालकांच्या अटकेच्या भीतीने आत्महत्या केली. वयाच्या 12 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. सीमा खातून उर्फ ​​खुशबू बेगम असे पीडितेचे नाव आहे. ही घटना मानकचार येथील झोडंग पुबेर गावात घडली. आई-वडिलांच्या अटकेच्या भीतीने सीमा खातून हिने गळफास लावून आत्महत्या केली. लग्नाच्या वेळी सीमा खातून फक्त 12 वर्षांची होती. त्यांचे पती मनोज यांचे कोरोना महामारीदरम्यान निधन झाले.

अनेक आरोपी पसार :अल्पवयीन मुलींचे लग्न केल्याप्रकरणी अनेक पालकांना अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या पालकांना अटकेची भीती होती. याच कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले. बालविवाहात सहभागी असल्याप्रकरणी शुक्रवारी राज्यात एकूण 2,221 जणांना अटक करण्यात आली. एकूण आरोपींची संख्या 8134 आहे. आसाम पोलिसांनी आणखी 3500 आरोपींना अटक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अनेक आरोपींनी घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांसमोर निदर्शने केली.

कारवाईबाबत तडजोड नाहीच :या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोठ्या संख्येमुळे राज्यात मानवतेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे गृहमंत्रालय सांभाळत असलेले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले की, बालविवाहाविरोधातील लढाईत मानवतेच्या आधारावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बालविवाहविरोधी मोहीम सुरूच राहणार आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

बालविवाह रोखण्यासाठी उचलले आहे पाऊल :मुख्यमंत्री म्हणाले, 14 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना जामीन मिळेल, तर दुसरीकडे 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना जामीन मिळणार नाही. अनेक पालक आरोपींच्या यादीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा आयुक्त काझींचे प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ही मोहीम मध्येच थांबणार नसल्याची चिन्हे आहेत.

ओवेसींनी साधला निशाणा : दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ज्या मुलींची लग्ने झाली आहेत, त्यांचे काय होणार, त्यांची काळजी कोण घेणार? आसाम सरकारने 4000 खटले नोंदवले, ते नवीन शाळा का उघडत नाहीत? आसाममधील भाजप सरकार मुस्लिमांबाबत पक्षपाती आहे. त्यांनी वरच्या आसाममध्ये भूमिहीन लोकांना जमीन दिली पण खालच्या आसाममध्ये तसे केले नाही, अशा शब्दात ओवेसींनी टीका केली आहे.

हेही वाचा: Child Marriage in Assam : बालविवाहाविरोधात मोठी कारवाई, आसामात १८०० जणांना अटक, पुजाऱ्यांचाही समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details