महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 15, 2022, 11:05 AM IST

Updated : Jun 15, 2022, 5:12 PM IST

ETV Bharat / bharat

Aaditya Thackeray Live Updates : हनुमान गढी येथे आदित्य ठाकरेंनी केले हनुमान चालीसाचे पठण

Aaditya Thackeray In Ayodhya Live Updates
आदित्य ठाकरे अयोध्या दौरा

17:10 June 15

हनुमान गढी येथे आदित्य ठाकरेंनी केले हनुमान चालीसाचे पठण

हनुमान गढी येथे आदित्य ठाकरेंनी केले हनुमान चालीसाचे पठण

16:09 June 15

मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल - आदित्य ठाकरे

अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार आहेत. जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व, मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणाच्या अटी-शर्ती नाही. अयोध्येत आमचं साधूमहंतांकडून स्वागत, असेही मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

14:20 June 15

आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतले

आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतले

आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतले

13:42 June 15

आदित्य ठाकरेंनी दर्शन घेतलेल्या इस्कॉन मंदिराचा आहे ठाकरे परिवाराशी जुना संबंध

आदित्य ठाकरेंनी दर्शन घेतलेल्या इस्कॉन मंदिराचा आहे ठाकरे परिवाराशी जुना संबंध

मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धर्माची नगरी अयोध्येत पोहोचले. अयोध्येला पोहोचल्यानंतर ते प्रथम शहरातील रामनगर भागात असलेल्या इस्कॉन मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले. रामललाच्या दर्शनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिरात पूजा केली. यामागे एक मोठे कारण आहे. आदित्य ठाकरे रामललाचे दर्शन घेण्यापूर्वी इस्कॉन मंदिरात का गेले ते आम्ही तुम्हाला सांगतो. इस्कॉन मंदिराचे पुजारी कूर्मावतार दास यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे दररोज मुंबईतील इस्कॉन मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे इस्कॉन मंदिराशी जुने नाते आहे. याच कारणामुळे आदित्य ठाकरे मुंबईतील इस्कॉन मंदिराला दररोज भेट देतात. त्याचप्रमाणे अयोध्येत आल्यावर आदित्य ठाकरे हे रामनगर येथील इस्कॉन मंदिरात जाऊन पूजा करून मुंबईशी जोडून घेतील आणि हे जेवणही घेणार आहेत. मंदिरात त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले.आदित्य ठाकरे येथे सुमारे १ तास मुक्काम करतील, त्यानंतर ते शहरातील पंचशील हॉटेलमध्ये विश्रांती घेतील आणि साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधतील.

13:22 June 15

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी अयोध्येतील इस्कॉन मंदिरात दर्शन घेतले आहे

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी अयोध्येतील इस्कॉन मंदिरात दर्शन घेतले आहे

12:20 June 15

अयोध्या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे दाखल.. ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतला आढावा

अयोध्या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे दाखल.. ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतला आढावा

अयोध्या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे दाखल.. ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतला आढावा

12:05 June 15

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अयोध्येत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अयोध्येत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अयोध्येत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

12:04 June 15

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

11:20 June 15

अयोध्या दौरा हा श्रद्धेचा दौरा, राजकीय नाही : आदित्य ठाकरे

लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

अयोध्या दौरा हा श्रद्धेचा दौरा, राजकीय नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. लखनऊ विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

10:43 June 15

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल.. इस्कॉन मंदिरात घेतले दर्शन

आदित्य ठाकरेंचे लखनऊमध्ये जंगी स्वागत.. अयोध्येकडे होणार रवाना

अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे श्री राम लल्लाच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मुंबईहून सकाळीच विमानाने आदित्य ठाकरे हे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आता थोड्याच वेळात ते अयोध्येकडे रवाना होणार आहेत.

असा आहे आदित्य ठाकरेंचा संपूर्ण दौरा

सकाळी 11.00 वाजता लखनौ विमानतळावर पोहोचतील

दुपारी 1.30 पर्यंत अयोध्येला पोहोचतील

दुपारी 3.30 वाजता आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.

4.45 वाजता इस्कॉन मंदिर, राम नगर येथे भेट देतील.

सायंकाळी साडेपाच वाजता रामललाचे दर्शन, श्री रामजन्मभूमी येथे पोहोचतील

संध्याकाळी 6.30 वाजता नवीन घाट अयोध्येत सरयू आरती करतील.

संध्याकाळी 7.30 वाजता लखनौला परत येतील

हेही वाचा : Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज अयोध्येत.. शिवसेनेकडून जोरदार तयारी.. रामलल्लाचे घेणार दर्शन

Last Updated : Jun 15, 2022, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details