महाराष्ट्र

maharashtra

Devotee Donated Gold Chhatra To Kedarnath : केदारनाथ चरणी भाविकांनी अर्पण केले सोन्याचे छत्र, विक्रमी भाविकांनी घेतले केदारनाथांचे दर्शन

By

Published : Apr 26, 2023, 12:57 PM IST

केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी 25 एप्रिलपासून उघडण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो भाविक केदारनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात. यावेळी भाविकांनी केदारनाथ बाबाला सोन्याचे छत्र आणि सोन्याचा घडा भेट दिला आहे.

Devotee Donated Gold Chhatra To Kedarnath
भाविकांनी भेट दिलेले सोन्याचे छत्र

केदारनाथ :बाबा केदारनाथचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले असून पहिल्या दिवशी 18 हजारहून अधिक भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले. तर दुसऱ्या दिवशी 12 हजारपेक्षाही अधिक भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले आहेत. भक्त बाबा केदारनाथांच्या दरबारात पोहोचून सोने अर्पण करत आहेत. यावेळी केदारनाथांना सोन्याचे छत्र आणि सोन्याचा घडा भाविकांनी दान केला आहे.

केदारनाथाला मिळाले सोन्याचे दान :केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी बाबा केदारनाथाला सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. एका दानशूर भाविकाने भगवान केदारनाथाला सोन्याचे छत्र आणि सोन्याचा घडा दान केला आहे. या सोन्याच्या छत्राची आणि घड्याची किंमत लाखो रुपयात आहे. मात्र भाविकांना भगवान केदारनाथांपुढे सोन्याच्या अनेक दागिन्यांचे दान दिले आहे. भाविक केदारनाथ मंदिरात मोठ्या भक्तिभावाने येऊन नतमस्तक होतात. आपल्या लाडक्या केदारनाथांपुढे विविध सोन्याची दागिने दानही देतात.

देश विदेशातील भक्तांची आहे बाबावर श्रद्धा :देश विदेशातील भक्तांची बाबा केदारनाथांवर अतूट श्रद्धा आहे. गेल्या वर्षी एका दानशूर भाविकाने भगवान शंकराच्या गर्भगृहात सोन्याचे 550 थर लावले होते. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी दरवर्षी बाबा केदारनाथांच्या मंदिराला कोटींची देणगी देतात. याशिवाय अनेक भक्त केदारनाथांना सोने, चांदी आणि कोटी रुपयाचे दान देतात. गेल्या वर्षी यात्रेच्या हंगामात 15 लाखाहून अधिक भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले होते. यावेळी मात्र हा आकडा मोडण्याची शक्यता आहे. बाबा केदारनाथ धामची यात्रा 1 महिन्यापूर्वी सुरू झाली आहे. दरम्यान हवामानही आपले रंग दाखवत असले तरी भाविकांची केदारनाथांवरील श्रद्धा डगमगली नाही. भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ धामला पोहोचत आहेत. केदारनाथ धामचे दरवाजे मोठ्या उत्साहात उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र यावर्षी केदारनाथ परिसरात मोठी बर्फवृष्टी होत आहे. तरीही भाविक मोठ्या संख्येने केदारनाथला पोहोचत आहेत.

हेही वाचा - Kedarnath Dham Door Open : बाबा केदारनाथांचे दरवाजे उघडल्याने भाविकांना घेता येणार दर्शन; चारधाम यात्रेचा झाला प्रारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details