महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 3, 2021, 11:32 AM IST

ETV Bharat / bharat

106 वर्षीय आजीबाईंना दिला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस

श्रीगंगानगरमधील चानणाधाम प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात 106 वर्षीय श्रीमती सरजीत कौर यांना मंगळवारी लस टोचवण्यात आली. लस टोचल्यानंतर आजीबाईंनी आनंद व्यक्त केला. लस घेण्यासाठी पात्र असलेल्यांनी ती टोचवून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सरजीत कौर
सरजीत कौर

नवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. या टप्प्यात लसीकरण केंद्रांवर 45 ते 59 वयोगटांतील व्याधीग्रस्त व्यक्ती तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. श्रीगंगानगरमधील चानणाधाम प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात 106 वर्षीय श्रीमती सरजीत कौर यांना मंगळवारी लस टोचवण्यात आली.

सरजीत कौर यांना लसीकरणाबाबत माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी लस टोचवून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचे कुटुंबीय त्यांना चानणाधाम स्वास्थ्य केंद्रात घेऊन आले. आजींचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असल्याने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना डॉक्टर रूपिंदर कौर यांना अडचण निर्माण झाली. याची माहिती आरसीएचओ डॉ. एचएस बराड यांनी राज्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी लसीकरणाची परवानगी दिली.

मंगळवारी सरजीत कौर यांना आरोग्य केंद्रावर बोलावून एएनएम मीरा वर्मा यांनी लस टोचवली. लस टोचल्यानंतर आजीबाईंनी आनंद व्यक्त केला. लस घेण्यासाठी पात्र असलेल्यांनी ती टोचवून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. तर दुसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details