ETV Bharat / technology

हायड्रोपोनिक शेतीतून लखपती होण्याची संधी, काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान? - hydroponic farming

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 7:53 PM IST

हायड्रोपोनिक्स शेतीला भारतात चालना मिळतोय. एका अहवालानुसार देशात 2022 ते 2029 दरम्यान भारतीय हायड्रोपोनिक्स शेतीचा व्यावसाय सुमारे 13.53% वाढण्याची अपेक्षा आहे. 2030 पर्यंत जागतिक हायड्रोपोनिक्स शेतीचा व्यावसाय 13.61 अब्ज USD पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या शेतीबद्दल आपण तपशीलवार माहिती घेणं आवश्यक आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

हैदराबाद : आज शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळं पिकांचं अधिक उत्पादन होण्यास मदत होत आहे. बदलत्या काळानुसार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरीही नफा कमवत आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानांपैकी एक म्हणजे हायड्रोपोनिक शेती, जे शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. या शेती तंत्राची खास गोष्ट म्हणजे या तंत्राचा वापर करून शेती करण्यासाठी मातीची गरज नाही. या तंत्रात केवळ वाळू, माती आणि खडे वापरून पीकाची लागवड करता येते. आपण इच्छित असल्यास, आपण या प्रकारच्या शेतीसाठी आपल्या टेरेसचा वापर करू शकता. हायड्रोपोनिक शेतीच्या या वैशिष्ट्यामुळं परदेशात या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी चांगले पैसे कमवत आहेत. आपल्या देशातही अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. त्यातून चांगला नफाही मिळत आहे.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? : हायड्रोपोनिक्स शेती मातीविना केली जाते. या प्रकारच्या शेती तंत्रज्ञानामध्ये मातीची गरज नाही. या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये पिकांची लागवड आणि कापणी थेट पाण्याच्या प्रवाहात केली जाते. त्यासाठी पाईपला वरून छिद्र पाडलं जातं. या छिद्रांमध्ये रोप लावली जातात. त्यानंतर पाईपमध्ये पाणी सोडलं जातं. त्यामुळं जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. अशी आधुनिक पद्धतीची शेती वापरली तर रोगाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळं पिकांना फवारणी करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं शेती करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरानं फळबागांमध्ये स्ट्रॉबेरीसारखी अनेक भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय जनावरांचा चाराही अशा प्रकारे तयार करता येतो. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ परदेशात वापरलं जात होतं. परंतु आता आपल्या देशातही त्याचा वापर वाढू लागला आहे.

भारतातील हायड्रोपोनिक शेती : भारतातील हायड्रोपोनिक शेती अद्याप बाल्यावस्थेत असतानाही त्यात वाढ होताना दिसतं आहे. 2023 पर्यंत, हायड्रोपोनिक शेती प्रणाली भारतातील विविध प्रदेशांमध्ये, प्रामुख्यानं शहरी भागात केल्याचं दिसून आलं. ही पद्धत वापरून हिरव्या पालेभाज्या, औषधी वनस्पती, टोमॅटो, काकडी, स्ट्रॉबेरी यासरखी बरेच पीक घरी पीकवता येतात. शिवाय, शाश्वत शेती आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशानं सरकार हायड्रोपोनिक्सच्या वाढीस हातभार लावत आहेत. हायड्रोपोनिक फार्म उभारण्यासाठी अनुदानं, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, नाविन्यपूर्ण शेती तंत्राचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन हे हायड्रोपोनिक्स उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या काही उपाययोजना आहेत.

हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे : हायपोनिक शेतीच्या नाविन्यपूर्ण पध्दतीमुळं तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या प्रकारच्या शेती पारंपारिक शेती करण्यापेक्षा सोपी आहे.

पाणी संवर्धन : हायड्रोपोनिक शेती हा पाणी टंचाई चांगला उपाय आहे. हायड्रोपोनिक्स पारंपारिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी 90% पाणी वापरतं, ज्यामध्ये पिकांसाठी पाण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. यामुळं, या स्त्रोतांचं पुन: परिसंचरण करता येतं. यात पाणी वाया जात नाही.

सातत्यपूर्ण पीक गुणवत्ता : भारतामध्ये पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृषी, विकासाची नियंत्रण प्रणाली आवश्यक आहे. पाणी आणि प्रकाश संतुलन प्रदान करून तुम्ही प्रत्येक कापणी त्या मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करू शकता. तथापि, व्यावसायिक ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ग्राहकांना पीक उत्पादन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी सातत्यपूर्ण गुणवत्ता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणे.

कमी कीटकनाशकांचा वापर : जेव्हा आपण पारंपारिक शेतीच्या स्वरूपाचा विचार करतो, तेव्हा कीटनाशकांवर होणारा खर्च खून जास्त होते. मात्र, हायड्रोपोनिक शेतीमुळं कीटकनाशकांची गरज कमी होते.

हे वाचलंत का :

  1. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor
  2. घरबसल्या असं करा आधार कार्ड अपडेट : ...अन्यथा 'या' तारखेनंतर मोजावे लागतील पैसे - Aadhaar Card Update
  3. शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन : डॉ. सी.व्ही. रामन यांनी संशोधनासाठी वापरलेला तबला मुख्य आकर्षण - Science City of Bangalore

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.