हैदराबाद Realme P2 Pro 5G : Realme नं आपल्या नवीन P-सीरीज स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केलीय. नवीन Realme P2 Pro 5G 13 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. नवीन स्मार्टफोन कर्व्ड डिस्प्लेसह उपलब्ध होईल. त्यात 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या सेगमेंटमधील हा एकमेव फास्ट चार्जिंग फोन असेल, असा दावा कंपनीनं केलाय.
Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर : Realme P2 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आलं आहे. हे प्रोसेसर कमी वीजेचा वापर करणार आहे. त्यामुळं बॅटरी बॅकअपता वापरकर्त्यांना अधिक वेळ फायदा होईल, असा दावा केला जात आहे. याशिवाय, नवीन डिव्हाइस सर्वात मोठ्या व्हेपर चेंबर (VC) सह लॉन्च केलं जाईल. जे फोनला चांगलं कूलिंग प्रदान करू शकतं. तसंच यातील जीटी मोड, सर्वोत्तम गेमिंग अनुभव वापरकर्त्यांना देईल, असं कंपनीचं म्हणणे आहे.
नवीन फोन विशेष AI फिचर : Realme नं म्हटलं आहे, की नवीन Realme P2 Pro 5G डिव्हाइसमध्ये अनेक AI वैशिष्ट्ये असतील. या वैशिष्ट्यांच्या मदतीनं, एआय स्मार्ट लूप आणि एअर जेश्चर इत्यादींचा समावेश आहे. या डिव्हाईसमध्ये सेगमेंटमध्ये सर्वात वक्र (कर्व्ड) डिस्प्ले असेल, असं कंपनीचं म्हणणे आहे.
लॉन्च इव्हेंट : नवीन डिव्हाइसचा लॉन्च इव्हेंट कंपनीच्या वेबसाइटवर तसंच फेसबुक, एक्स किंवा यूट्यूबच्या मदतीनं सोशल मीडिया चॅनेलवर 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पाहता येईल. कंपनीच्या वेबसाइटशिवाय, Realme P2 Pro 5G ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो.
हे वाचलंत का :
- Vivo T3 Ultra 5G थोड्याच वेळात होणार लॉंच, फोनमध्ये काय खास? - Vivo T3 Ultra 5G
- तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch
- मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars