हैदराबाद : Realme GT 7 प्रो 4 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये लाँच होणार आहे. मात्र कंपनीनं त्याआगोदरच एक मोठा ग्लोबल इव्हेट आयोजित केला आहे. Realm कंपनीनं 25 ऑक्टोबर 2024 रोजी 'डार्क हॉर्स ऑफ AI' नावाचा AI स्ट्रॅटेजी ग्लोबल इव्हेंट लॉंच करणार आहे. यामध्ये ते AI तंत्रज्ञानाच्या पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये, कंपनी AI तंत्रज्ञानात उद्योगातील दिग्गज क्वालकॉम आणि Google सह धोरणात्मक भागीदारी करेल. हे कंपनीचं पुढील फ्लॅगशिप मॉडेल, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आणि नेक्स्ट एआय द्वारे समर्थित असेल.
Let's witness the birth of the AI Dark Horse by noticing our AI Strategy Launch event on October 25th, 12:30PM (UTC+8) #DarkHorseOfAI pic.twitter.com/nvy66rNpWr
— realme Global (@realmeglobal) October 23, 2024
Realme GT 7 प्रो 4 नोव्हेंबर रोजी लाँच : Realme GT 7 प्रो, 4 नोव्हेंबर रोजी चीन लाँच होण्यापूर्वी जागतिक या फोनच्या जागतिक लॉंच बद्दल देखील माहिती देण्याची शक्यता आहे. या बाबत कंपनीनं म्हटलं की, ते प्रगत AI-चालित वैशिष्ट्यांबद्दल तपशील तिथ सादर करणार आहे. नवीन रिअलम UI 6.0 अधिक डायनॅमिक डिझाइन आणि शक्तिशाली आहे.
भारतात पहिला स्नॅपड्रॅगन 8 एलिट-संचालित फोन : realme नं अलीकडंच पुष्टी केली आहे, की ते नोव्हेंबरमध्ये भारतात पहिला स्नॅपड्रॅगन 8 एलिट-संचालित फोन म्हणून GT7 प्रो लॉन्च करेल. नोव्हेंबरमध्ये रोल आउटच्या अगोदर, चीनी बाजारपेठेसाठी रियलमी UI 6.0चा रोडमॅप देखील तयार झालाय. रिअलम ‘डार्क हॉर्स ऑफ AI’ इव्हेंट 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 AM IST वाजता सुरू होईल. कंपनी या कार्यक्रमाचं थेट प्रेक्षपण करणार आहे. त्यामुळं तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा त्यांच्या चॅनेलवर या कार्यक्रमाची माहिती माहिती मिळवू शकता.
हे वाचलंत का :
- CM नायडू यांच्या हस्ते भारतातील पहिल्या DGCA मध्यम श्रेणी कृषी ड्रोनचं उद्घाटन
- 'हे' आहेत जगातील 10 सर्वात सुंदर मोर, जगातील सर्वात मनमोहक पक्षी
- स्पॅम कॉलपासून सुटका : कोळसा खाणीतही चालणार हायस्पीड इंटरनेट, संकटात होईल मदत