ETV Bharat / technology

रब्बी पीक विमा काढण्यासाठी फक्त शेवटचे दोन दिवस बाकी, 'इथं' करा थेट अर्ज - CROP INSURANCE SCHEME

Rabi Crop Insurance 2024 : रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा 15 डिसेंबपर्यंत तुम्हाला काढता येणार आहे. जाणून घ्या काय आहे प्रक्रिया...

Rabi Crop Insurance
रब्बी पीक विमा (MH GOV)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 13, 2024, 12:58 PM IST

हैदराबाद Rabi Crop Insurance 2024 : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामात देखील एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा 15 डिसेंबपर्यंत उतरवावा, असं अवाहन सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहिती तसंच अर्ज करण्यासाठी http://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट देण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

Rabi Crop Insurance Application
अर्ज प्रक्रिया (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)

रब्बी हंगामासाठी पीक विमा : रब्बी पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी याआधी विमा काढणं अपेक्षित आहे. राज्य सरकारनं रब्बी हंगामातही शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांना या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचा पीक विमा घेण्याचं आवाहन केलं आहे.

शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 : महाराष्ट्रात रब्बी हंगामातील पीक विम्याचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 असून उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग पिकांसाठी अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. गेल्या वर्षी, 2023-24 च्या रब्बी हंगामात, विमा योजनेअंतर्गत सुमारे 71 लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

रब्बी हंगाम पीकं : उन्हाळी भात, गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग, कांदा या पीकांवर लाभ घेता येईल. वरील पीकं घेणारे सर्व शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. ही योजना कर्जदार तसेच कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असेल.

प्रधानमंत्री पीक विमा : नैसर्गिक आपत्ती कृषी क्षेत्रात अनेक समस्या निर्माण करतात. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर होणारे विविध रोग इत्यादींमुळे शेतकऱ्याला अपेक्षित पीक मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारनं पीक विमा देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील शेतकऱ्यांना या प्रधानमंत्री पीक विम्याचा फायदा होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी प्रीमियमची रक्कम भरावी लागत होती. तथापि, आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना फक्त १ रुपयांत पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

प्रधानमंत्री पीक विम्याची उद्दिष्टे : नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोग यासारख्या अनपेक्षित प्रतिकूल परिस्थितीमुळं पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करणे. पिकांच्या नुकसानीच्या सर्वात कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिरता राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित शेती तंत्रज्ञान आणि साहित्य वापरण्यास प्रोत्साहित करणे. कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून ते अन्न सुरक्षा, पीक विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास आणि स्पर्धात्मकता ही उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल आणि शेतकऱ्यांना उत्पादन जोखमींपासून वाचवेल.

राज्यात 2016-17 पासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं 2023 च्या खरीप हंगामापासून एक रुपया पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी, केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.

रब्बी पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा :

पात्रता निकष : रब्बी पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत आहात याची खात्री करा.

  • तुमचा आधार क्रमांक वैध असावा.
  • तुमचं बँकेक खातं असलं पाहिजे.
  • तुम्ही रब्बी हंगामात अधिसूचित पीक घेतलेलं पाहिजे.
  • तुम्ही अधिसूचित क्षेत्रातील रहिवासी असलं पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे : रब्बी पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • आधार कार्ड
  • बँक खातं पासबुक किंवा स्टेटमेंट
  • जमिनीच्या मालकीची कागदपत्रं (खसरा)
  • पीक पेरणी प्रमाणपत्र (पटवारी किंवा गावाच्या सरपंचानं जारी केलेलं)

स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया :

  • पीएमएफबीवाय वेबसाइटला भेट द्या:
  • "ऑनलाइन अर्जावर" वर क्लिक करा: होमपेजवर, "ऑनलाइन अर्ज करा" बटणावर क्लिक करा.
  • तुमचं राज्य आणि जिल्हा निवडा: ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचं राज्य आणि जिल्हा निवडा.
  • तुमचं पीक आणि योजना निवडा: तुम्हाला विमा करायचा असलेला रब्बी पीक आणि तुम्हाला अर्ज करायचा असलेली योजना निवडा (उदा., पीएमएफबीवाय किंवा आरडब्ल्यूबीसीआयएस).
  • तुमची माहिती भरा : तुमचं नाव, आधार क्रमांक आणि बँक खात्याच्या तपशीलांसह तुमचे तपशील प्रविष्ट करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: तुमचे आधार कार्ड, बँक खातं पासबुक आणि जमिनीच्या मालकीची कागदपत्रं यासह आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  • प्रीमियम भरा: पेमेंट गेटवेद्वारे प्रीमियमची रक्कम ऑनलाइन भरा.
  • तुमचा अर्ज सबमिट करा : सर्व तपशील भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड केल्यानंतर, तुमचा अर्ज सबमिट करा.

पर्यायी अर्ज पद्धत : जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यास सोयीस्कर वाटत नसेल, तर तुम्ही रब्बी पीक विम्यासाठी खालील मार्गांनी अर्ज करू शकता.

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC): तुम्ही जवळच्या CSC ला भेट देऊ शकता आणि CSC ऑपरेटरच्या मदतीनं रब्बी पीक विम्यासाठी अर्ज करू शकता.

बँक शाखा : तुम्ही PMFBY अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकृत असलेल्या बँक शाखेत रब्बी पीक विम्यासाठी अर्ज करू शकता.

विमा कंपनी कार्यालये : तुम्ही PMFBY योजनेअंतर्गत लिंक केलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात भेट देऊ शकता आणि रब्बी पीक विम्यासाठी अर्ज करू शकता.

रब्बी पीक विम्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे ही एक सोपी आणि सोयीस्कर प्रक्रिया आहे. या बातमीत दिलेल्या चरणांचं अनुसरण करून, तुम्ही रब्बी पीक विम्यासाठी सहजपणे अर्ज करू शकता आणि तुमच्या पिकांचं अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करू शकता. तुमचा अर्ज वेळेवर प्रक्रिया होईल याची खात्री करण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करायला विसरू नका.

हे वचालंत का :

  1. पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
  2. पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
  3. संपूर्ण कर्जमाफीसाठी बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभा आक्रमक, शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन - Farmar Protest In Beed

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.