हैदराबाद Flipkart Big Billion Days Sale 2024 : सणाचा हंगाम अगदी जवळ आला आहे. त्याआधी फ्लिपकार्टनं बिग बिलियन डेज सेल 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. विक्री अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उत्पादनांच्या श्रेणीवर ऑफर देत आहे. खरेदीदारांना कॅशबॅक आणि ईएमआय तसंच एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर सूट मिळणार आहे. Flipkart Big Billion Days Sale 2024 दरम्यान, Apple, Google आणि Samsung सारख्या शीर्ष ब्रँड्सच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या ऑफर उपलब्ध : 27 सप्टेंबरपासून Flipkart Big Billion Days Sale सुरू होईल. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना फक्त एक दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी या सेलचा फायदा मिळणार आहे. या वर्षी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीनं बँक ऑफर देण्यासाठी HDFC बँकेशी हातमिळवणी केली आहे. खरेदीदार डेबिट/क्रेडिट आणि सुलभ EMI व्यवहारांवर 10 टक्के झटपट सूट मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट त्याच्या सुपर मनी ॲपद्वारे UPI वर आजीवन कॅशबॅकची ऑफर देणार आहे. ज्यांना स्मार्टफोन्स खरेदी करायचे आहेत ते Samsung Galaxy S23, Galaxy S23 FE आणि Galaxy A14 5G सारख्या सॅमसंग स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर मिळवू शकतील. ग्राहक आतापासून हँडसेट त्यांच्या विश लिस्टमध्ये फोनला जोडू शकतात. तसंच त्याची विक्री सुरू होताच ते खरेदी करू शकतात. नथिंग फोन 2A आणि 2A प्लस आणि Acer Aspire 3 वरही आकर्षक ऑफर देण्यात येणार आहेत.
फ्लिपकार्ट एक्सचेंज डील : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पुढील काही दिवसांत टीव्ही, स्मार्टवॉच, टॅब्लेट, ऑडिओ उपकरणे, लॅपटॉप आणि इतर घरगुती उपकरणांवर डील जाहीर करेल. याव्यतिरिक्त, नथिंग फोन 2a आणि iPhone मॉडेल्सवरील ऑफर अनुक्रमे 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर रोजी जाहीर केल्या जातील. सवलत आणि बँक लाभांव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट एक्सचेंज डील आणि फ्लिपकार्ट पे लेटर क्रेडिट देखील 1 लाख रुपयांपर्यंत ऑफर करेल.