नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनं (DRDO) अग्नि 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय. डीआरडीओनं शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्नि-4 क्षेपणास्त्रानं चाचणीदरम्यान सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची पूर्तता केली. अग्नि-4 ची पहिली यशस्वी चाचणी 15 नोव्हेंबर 2011 रोजी झाली. त्यानंतर अद्ययावत चाचण्यांसह एकूण 8 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
"मध्यवर्ती श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण, अग्नी-4 6 सप्टेंबर 2024 रोजी ओडिशातील चांदीपूर येथील ITR वरून करण्यात आले."- संरक्षण मंत्रालय
जून 2022 मध्येही चाचणी : स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडनं याबाबत माहिती दिली. 'ही एक नियमित चाचणी होती. यापूर्वी जून 2022 मध्येही चाचणी घेण्यात आली होती. भारत या चाचणीद्वारे आपली क्षमता दाखवून देतोय. 66 फूट लांब आणि 17 हजार किलो वजनाचे अग्नी-4 हे जगातील इतर क्षेपणास्त्रांपेक्षा हलकं आहे. हे डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलं आहे. त्यात एक टन शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
4 हजार किलोमीटरपर्यंत मारा : पारंपरिक, थर्मोबॅरिक आणि सामरिक अण्वस्त्रे या क्षेपणास्त्राच्या मदतीनं शत्रूवर तीन प्रकारची शस्त्रे डागता येतात. अग्नि-4 क्षेपणास्त्र 3 हजार 500 ते 4 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र थेट 900 किलोमीटर उंचीपर्यंत उडू शकतं. या वर्षी 4 एप्रिल रोजी, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) नं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) सोबत, किनारपट्टीवरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-प्राइमची यशस्वी चाचणी चाचणी केली होती.
हे वाचंलत का :
बोइंग स्टारलाइनर पृथ्वीवर परतलं - Boeing Starliner returned to Earth