ETV Bharat / state

पुतळ्याच्या मागे पोलीस तर पोलिसांच्या मागे आंदोलक, ठाण्यात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ - Yuva Sena protest in Thane

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 8:48 PM IST

Omar Abdullah News : जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे. यावरुन राज्यातील राजकीय नेते तथा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आज (24 मार्च) ठाण्यात शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

Yuva Sena protest in Thane against Omar Abdullah statement to dont construction of Maharashtra Bhawan in Kashmir
पुतळ्याच्या मागे पोलीस तर पोलिसांच्या मागे आंदोलक, ठाण्यात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात ठाण्यात युवा सेनेचे आंदोलन

ठाणे Omar Abdullah News : जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu-Kashmir) कलम 370 हटवल्यानंतर तिथं महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारनं श्रीनगरच्या विमानतळानजीकच बडगाम येथे अडीच एकर जागा दिली आहे. मात्र, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याला विरोध केलाय. त्यामुळं राज्याभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केल्या जातोय. या पार्श्वभूमीवर आज (24 मार्च) ठाण्यात शिदें गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनादरम्यान वेगळंच चित्र बघायला मिळालं.

नेमकं काय घडलं? : आज ठाण्यातील टेंभी नाका येथे युवासेना अध्यक्ष नितीन लांडगे आणि शिवसेना शिंदे गट प्रवक्ते राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना ओमर अब्दुल्ला यांचा पुतळ्याचं दहन करायचं होतं. मात्र, पोलिसांना तो पुतळा आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर एका कार्यकर्त्यानं पोलिसांच्या हातून तो पुतळा हिसकावून घेत तेथून पळ पाढला. त्यानंतर पोलीस देखील त्याच्या मागे धावू लागले. याचवेळी संतप्त आंदोलक पोलिसांच्या मागे पळू लागले. जवळपास एक किलोमीटर हे सर्व एकमेकांमागे धावत होते. त्यामुळं पुतळ्याच्या मागे पोलीस तर पोलिसांच्या मागे आंदोलक, असं चित्र बघायला मिळालं.

काय म्हणाले होते ओमर अब्दुल्ला? : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवनावर भाष्य केलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचं सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. तसंच या महाराष्ट्र भवनामुळं स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिसकावला जाईल, असं ते म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. Maharashtra Monsoon Assembly Session Updates: नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार -अजित पवार
  2. Eknath Shinde Meet With JK LG : जम्मू काश्मीरमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन, एकनाथ शिंदेंनी मागितली राज्यपालांकडे जागा
  3. Omar Abdullah in Bharat Jodo Yatra : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी, सुरक्षेतील त्रुटीमुळे थांबवली यात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.