मुंबई Water Scarcity Increased : राज्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र झालीय. गतवर्षी याच दिवशी केवळ एक हजार गावे आणि वाड्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा (Water Supply) सुरू होता. यंदा मात्र हा आकडा दहा हजार पर्यंत गेल्यानं नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण आहे. सर्वाधिक टँकर हे मराठवाड्यात सुरू असून साडे सतराशे गावे आणि वाड्यांवर 1849 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती, कक्ष अधिकारी प्रवीण कुमार पवार यांनी दिलीय.
काय आहे राज्यातील टँकर पुरवठ्याची स्थिती? : मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती असून केवळ छत्रपती संभाजीनगरात 435 गावे आणि 65 वाड्यांवर 708 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालनामध्ये 340 गावे आणि 82 वाड्यावर 506 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यात 350 गावे आणि 328 वाड्यांवर 434 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धाराशिवमध्ये 91 गावे पाणीटंचाईग्रस्त असून 135 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
कोकणातही पाणीटंचाईच्या झळा : कोकणातील ठाणे जिल्ह्यात 54 गावे आणि 165 वाड्यावर 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. रायगड जिल्ह्यात 56 गावे आणि 244 वाड्यांवर 46 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 91 गावे आणि 258 वाड्यांवर 24 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. पालघर जिल्ह्यात 31 गावे आणि 129 वाड्यांवर 60 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
विदर्भात अद्याप पाणीटंचाई नाही : राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा टँकरद्वारे सुरू असला तरी विदर्भात अद्याप पाणीटंचाईची तीव्रता तितकी झालेली नाही. अमरावती जिल्ह्यात दहा गावांवर 13 टँकरद्वारे आणि बुलढाणा जिल्ह्यात 65 गावांवर 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यात 11 गावांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 2973 गाव आणि 761 वाड्यांमध्ये एकूण 3692 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गरज भासल्यास आणखीही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असं प्रवीण कुमार पवार यांनी सांगितलंय.
हेही वाचा-