ETV Bharat / state

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान; जनतेचा कौल कुणाला मिळणार? - Vidhan Parishad Election 2024 - VIDHAN PARISHAD ELECTION 2024

Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणूकीत राज्यातील मतदारांचा कौल कोणाला? कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Vidhan Parishad Election 2024
Vidhan Parishad Election 2024 (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 7:50 AM IST

मुंबई Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज निवडणूक होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात रस्सीखेच आहे. असे असले तरी मुंबई शिक्षक मतदार संघात, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये आपापसात लढत रंगणार आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघ : मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. तर भाजपकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीचा धर्म न पाळता एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी नलावडे हे निवडणूक लढवत आहेत. अशाप्रकारे या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघात एकूण 15 हजार 839 मतदार आहेत.

मुंबई पदवीधर मतदार संघ : मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून किरण शेलार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. या मतदारसंघात या दोघांमध्ये अतिशय चुरशीची अशी लढत होणार आहे. दोन्ही बाजूंनी सर्व शक्ती पणाला लावली गेली आहे. भाजपाला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघामध्ये एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.

कोकण पदवीधर मतदार संघ : कोकण पदवीधर मतदार संघामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेकडून अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं होतं. परंतु देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघांमध्ये भाजपाकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघात काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात निरंजन डावखरे विरुद्ध रमेश किर अशी निवडणू लढत रंगणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 23 हजार 225 मतदार आहेत.

नाशिक शिक्षक मतदार संघ : नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथेही महायुतीचा धर्म न पाळता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अपक्ष म्हणून विवेक कोल्हे हे निवडणूक लढवत असल्यानं नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे मतदारांना आमिष म्हणून या मतदारसंघात पैसे, साड्या, नथ, कपडे वाटप केल्याचे प्रकार घडल्यानं हा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात एकूण 69 हजार 398 मतदार आहेत.

हेही वाचा

  1. भिवंडीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल - ACB Action In Bhiwandi
  2. ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प आता MMRDA करणार, महा मेट्रो ऐवजी MMRDA कडं जबाबदारी - internal metro project in Thane
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित - Ghatkopar hoarding incident case
  4. सव्वा महिन्याच्या उपचारानंतर T- 53 वाघाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं - Pench Tiger Reserve

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.