ETV Bharat / state

बापरे! देशात 5 वर्षांखालील 38 टक्के बालके बुटकी, युनिसेफच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष - युनिसेफचा बालकांविषयी निष्कर्ष

Stunted Growth Children: महिलांच्या गर्भावस्थेपासून पुढील एक हजार दिवस हे बाळांसाठी निर्णायक असतात. या काळात योग्य काळजी न घेतल्यास बालकांची शारीरिक वाढ खुंटते. युनिसेफच्या एका सर्वेक्षणात देशामध्ये पाच वर्षांखालील 38 टक्के बालके बुटकी असून निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण तसेच तणावाने ग्रस्त असल्याचं आढळून आलं आहे, अशी माहिती युनिसेफचे डॉ. कारभारी खरात यांनी दिली आहे.

38 percent of children
कमी उंचीची बालके
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:11 PM IST

बालकांच्या कमी उंचीच्या समस्येविषयी बोलताना डॉ. कारभारी खरात

नाशिक Stunted Growth Children : गर्भावस्थेपासूनचा काळ आईसाठी आणि बाळासाठी महत्त्वाचा असतो. माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या काळात बाळाच्या मेंदूची 75 टक्के वाढ पूर्ण होते. या कालावधीला पहिले हजार दिवस असे संबोधले जाते. या काळात बाळाला योग्य संगोपन, माया आणि योग्य पोषण मिळाले तर मेंदूची पूर्ण वाढ होण्याची शक्यता असते.

सुरुवातीच्या दोन वर्षांत मुलांची आकलन शक्ती, सामाजिक कौशल्य तसेच सज्ञात्मक आणि भावनिक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा आहे. हा विकास होण्यासाठी बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची गरज असते. आई सशक्त, निरोगी आणि आनंदी असणे तसेच मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळणे हा बाळाचा मूलभूत अधिकार आहे, असं युनिसेफचे डॉ. कारभारी खरात यांनी सांगितले.

5 वर्षांखालील 38 टक्के बालके बुटकी: "कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 5 वर्षाखालील 43 टक्के बालकांना खुजेपणा आणि योग्य विकासाची पातळी गाठू न शकण्याचा धोका आहे. तसेच भारतही अतितीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे, पाच वर्षांखालील 38 टक्के बालके बुटकी असून निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण तसेच ताणतणावाने ग्रस्त असल्याचं आढळून आलं आहे. राज्यात अद्यापही कुपोषणाचे प्रमाण अधिक असून जवळजवळ एक तृतीयांश बालके तीव्र कुपोषित म्हणजे अपेक्षित उंचीपेक्षा बुटकी तर प्रत्येक चौथे बालक कमी वजनाचे आढळून येत असल्याचं" डॉ. खरात यांनी सांगितलं.

काही भागात प्रसूती घरीच केली जाते: गरोदरपणात योग्य ती काळजी न घेतल्यास बाळाच्या विकासाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये गरोदरपणा आधी आणि नंतरही महिलांनी व्यसन करणे, जड उचलणे, भ्रमणध्वनीचा होणारा अतिवापर टाळावा. पौष्टिक अन्न खावे. आजही आपल्याकडे ग्रामीण भागात प्रसूती ही घरीच होते. राज्याचा विचार केल्यास भिवंडीत हे प्रमाण 30 टक्के तर मालेगावात 40 टक्के इतके आहे. घरीच होणाऱ्या बाळंतपणात बाळ झाल्यावर त्याला आईचे दूध दिले जात नाही. जन्म झाल्याबरोबरच आईचे दूध अडीच एमएल दिले तरी त्याची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुसरीकडे नवजात बालकाला लागलीच अंघोळ घातली जाते. त्यामुळे बाळाच्या शरीरातील तापमान बाहेरील वातावरणाशी समरस न झाल्याने काही वेळा बालकांचा मृत्यू संभवतो. आरोग्य विभागाच्यावतीनं गरोदर मातांचा हा काळ तणावमुक्त राहण्यासाठी ''सिलेक्शन अँड कौन्सिलिंग बर्थ'' ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं डॉ. खरात यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. ज्ञानपीठाच्या निवडीत यंदा उर्दूसह संस्कृतचा मिलाफ, उर्दू कवी गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना पुरस्कार जाहीर
  2. अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना
  3. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी', सीबीआयनं घेतली न्यायालयात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.