ETV Bharat / state

कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं सरासरी तिघांना गमवावा लागला 'जीव', विद्युत अपघाताबाबत अशी घ्या काळजी - Be careful electrical accidents - BE CAREFUL ELECTRICAL ACCIDENTS

Be careful electrical accidents : कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या धक्यामुळं महिन्याला सरासरी तीन जणांना जीव गमवावा लागत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळं नागरिकांसह शेतकऱ्यांनी विजेचं काम करताना काळजी घेण्याचं आवाहन सहायक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे यांनी केलं आहे.

Be careful electrical accidents
विद्युत अपघातांपासून रहा सावध (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 10:59 PM IST

कोल्हापूर Be careful electrical accidents : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात असणाऱ्या कोपर्डे गावात दोन भावांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या विद्युत अपघातानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र गेल्या दीड वर्षात महिन्यात सरासरी तीन व्यक्तींना विजेच्या धक्यानं प्राणाला मुकावं लागलं आहे. या अपघाताचे प्रमुख कारण निष्काळजीपणा असून जीवितहानी टाळण्यासाठी काळीज घेणे गरजेचे आहे.

महिन्याला सरासरी तिघांचा बळी : कृषीपंप, घरगुती विद्युत जोडणी करताना अपघात होण्याचं प्रमाण मोठं आहे. पावसाळा या अपघातात वाढ होताना दिसते. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील वीजेबाबत काळजीपूर्वक काम करायला हवं, असं सहाय्यक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे यांनी म्हटलं आहे. कृषी पंप, तुटलेल्या वीजेच्या वायरचा स्पर्श स्पर्श होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील कोपर्डे गावच्या दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय. जानेवारी 2023 ते मे 2024 या दीड वर्षाच्या कालखंडात कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत अपघातात 54 जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. महिन्याला सरासरी तीघांचा वीजेमुळं जीव जातोय. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्यानं हे अपघात घडत आहे, अशी आकडेवारी सांगते. मात्र, वीजेचं काम करताना काळजी घेतल्यास जीवघेणे अपघात टळू शकतात. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षितता बाळगावी. ओल्या हातानं कृषी पंप हाताळू नयेत, असं आवाहन सहाय्यक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे यांनी केलं आहे.

मुक्या प्राण्यांनाही बसतो फटका : गेल्या दीड वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात 20 प्राणी विद्युत अपघाताचे शिकार झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळं उसाच्या शेताला तसंच व्यवसायाच्या ठिकाणी आग लागण्याच्या 333 घटना घडल्या आहेत. विद्युत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना महावितरणकडून 4 लाखांची मदत मिळते, तर जखमी झालेल्यांना 2 लाख रुपये मदत दिली जाते. मात्र, यामध्ये विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा लागतो, तरच ती मदत मिळते. विद्युत अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सर्किट ब्रेकर्स (एमसीबी/ इएलसीबी) बसविणे, रिलेज, फ्युजेसचा वापर करणे, आर्थिंग सुस्थितीत ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

इलेक्ट्रिक शॉक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी :

  1. विजेचं काम करताना नेहमी सुरक्षा हातमोजे, बुट घालावे.
  2. इलेक्ट्रिकल उपकरणे हाताळताना कधीही ओल्या हातानं काम करु नये.
  3. सॉकेटमधून तारांसह विद्युत तार ओढणं टाळावं.
  4. खुल्या कॉर्ड वायर थेट सॉकेटमध्ये घालू नये. नेहमी प्लग पिनचा वापर करावा.
  5. अनेक प्लगसह एकच सॉकेट लोड करू नका.
  6. नेहमी तीन-पिन सॉकेट वापरा. पृथ्वी बिंदू निरोगी असल्याची पुष्टी करा.
  7. नेहमी ISI चिन्हांकित साहित्य वापरा.

'हे' वाचलंत का :

  1. कोपर्डे गावात दोन भावांचा शॉक लागून मृत्यू - Two brothers died of shock
  2. वीजेच्या धक्क्यानं एकाच आई-वडिलांसह लेकाचा मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना
  3. घरातील एसीसह कुलरमुळे जीवाला होऊ शकतो धोका, सुरक्षेसाठी चुकूनही 'या' टिप्सकडं करू नका दुर्लक्ष - summer 2024 heatwaves

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.