ETV Bharat / state

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले - Pune Airport New Terminal

Pune Airport New Terminal : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलचे चार महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते. उद्घाटनानंतर आता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यावरून आज प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यात आलीय. या टर्मिनलवरून पहिल्या विमानाचे उड्डाण रविवारी झाले.

Pune Airport New Terminal
पुणे विमानतळ (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 8:02 PM IST

पुणे Pune Airport New Terminal : पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील (Pune Airport) नव्यानं उभारण्यात आलेले टर्मिनल आज केंद्रीय नागरी राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले. नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला मोहोळ यांच्याहस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.

प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ (ETV BHARAT Reporter)

जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर वाहतूक सेवा : गेल्या 10 वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतातील हवाई वाहतूक क्षेत्राने मोठी प्रगती केलीय. जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर ही वाहतूक सेवा पोचली आहे. तसेच गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत देशात 469 नवीन हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली, बंगळूर आणि अयोध्या यासारख्या विमानतळावर नवीन टर्मिनल उभे राहिले आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी असल्याचं, यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुणेकरांना अभिमान वाटेल अशी वास्तु : आगामी काळात देशभरात आणखी 20 ते 25 नवीन विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. तसेच पुण्यातील नव्या टर्मिनलमुळं वर्षाला सुमारे 90 लाख ते 1 कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक इथून करणं शक्य होणार आहे. प्रत्येक पुणेकरांना अभिमान वाटेल अशी वास्तु यानिमित्तानं उभी राहिली आहे. तसेच जुन्या टर्मिनल मधील सर्व सेवा लवकरच नव्या टर्मिनलमधून उपलब्ध करून दिल्या जातील असं मोहोळ यांनी सांगितलं.

नवीन टर्मिनलची उभारणी : पुण्यातील विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुरे पडणारे जुने टर्मिनल लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर या नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली. पुण्याची संस्कृती आणि समृध्द परंपरा यांचे दर्शन या वास्तुमधून घडेल अशा पद्धतीनं ते सजवण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. 180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, थोडक्यात वाचले प्रवाशांचे प्राण - Pune Aircraft Accident
  2. Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका
  3. Aircraft Tyre Burst at Pune Airport : पुणे विमानतळावर विमानाचा टायर फुटला; विमानसेवा कोलमडली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.