ETV Bharat / state

गरोदर महिलेला कळा सहन होईनात, नदीला आला महापूर, गावात रस्ता नाही...तहसीलदार बनले 'देवदूत' - Pregnant Woman Rescue Gadchiroli - PREGNANT WOMAN RESCUE GADCHIROLI

Pregnant Woman Rescue Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Gadchiroli Heavy Rains) पडल्यानं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला. पावसाळ्याच्या दिवसात गरोदर महिलांना उपचारासाठी रुग्णालयात पोहचवण्यासाठी अडचणी येतात ही बाब येथे नेहमीच निदर्शनास येते. असाच प्रकार अतिदुर्गम नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात घडला आहे.

Gadchiroli Flood News
गरोदर महिलेला नाल्याच्या पुरातून केलं रेस्क्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 9:21 AM IST

Updated : Aug 6, 2024, 4:39 PM IST

गडचिरोली Pregnant Woman Rescue Gadchiroli : जिल्ह्यात पावसाने कहर (Gadchiroli Heavy Rains) केला असून नदी-नाल्यांना पूर आला. अशातच भामरागड तालुक्यातील कुचेर येथील शीला सडमेक या नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. पावसामुळं इरपनार या गावाजवळील वाहणाऱ्या नाल्याला पूर आला होता. त्यामुळं महिलेला रुग्णालयात दाखल करणं कठीण झालं होतं. मात्र, तहसीलदारांनी बचाव पथकाच्या मदतीनं महिलेला रेस्क्यू करत रुग्णालयात दाखल केलं.

प्रतिक्रिया देताना नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार (ETV BHARAT Reporter)

नाल्याच्या पुरातून महिलेला केलं रेस्क्यू : शीला सडमेक ही भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कुचेर येथील रहिवासी आहे. प्रसुती वेदना होत असताना ती मोटरसायकलनं रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. मात्र, गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही, त्यातच इरपणार गावाजवळ असलेला नाला तुडुंब वाहत असल्यानं रुग्णालयात पोहोचणं शक्य झालं नाही. दरम्यान, याबाबतची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार किशोर बागडे यांनी ही माहिती नायब तहसीलदार यांना दिली. नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार स्वतः: रिस्क बोट आणि दोन बचाव पथकं घेऊन नाल्यावर पोहचले. त्यानंतर लगेच गरोदर महिलेला रेस्क्यू करून तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र : गडचिरोली हा अतिदुर्गम भाग आहे. त्यामुळं येथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. यापूर्वी देखील भामरागड तालुक्यातील एका महिलेला जेसीबीच्या बकेटद्वारे नाला पार करावा लागला होता. तर कोरची तालुक्यात खाटेची कावड करून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आलं.

गडचिरोलीत पूर सदृश्य स्थिती : मागील काही दिवसांपासून पावसानं कहर केला असून, याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्याला बसला. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

हेही वाचा -

Nashik Road Issue : झोळीतून दवाखान्यात नेताना गर्भवतीचा मृत्यू, मृतदेह आणतानाही नातेवाईकांची अडीच किलोमीटरची पायपीट

Health Services On Ventilator : 'या' जिल्ह्यातील आदिवासी बांधव आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत

Palghar pregnant woman गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना बंद पडली जीप, खराब रस्ता असल्याने हाल

Last Updated : Aug 6, 2024, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.