ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'या' गावाचा विषयच "लय हार्ड", वाहनांच्या नंबरवरून ओळखली जातात घरं - VEHICLE FANCY NUMBER

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली हे गाव वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी ओळखलं जातं. येथील अनेक घरांमध्ये गेल्या चार पिढ्यांपासून वाहनांना एकच नंबर आहे. वाचा ही स्पेशल स्टोरी..

PRAYAG CHIKHALI VILLAGE
वाहनांना फॅन्सी नंबर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 4:12 PM IST

Updated : Nov 29, 2024, 4:21 PM IST

कोल्हापूर : 'जगात भारी कोल्हापुरी' अशी कोल्हापूरची ओळख आहे. या जिल्ह्यात मुलखावेगळी माणसं गावागावात पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली हे गाव वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक कुटुंबात असलेल्या दुचाकी, चार चाकी, ट्रॅक्टर वाहनांचे फॅन्सी नंबर त्या घराची ओळख बनली आहे. अनेक घरांमध्ये तर गेल्या चार पिढ्यांपासून वाहनांना एकच नंबर आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर अर्ज करून हौस म्हणून येथील गावकऱ्यांनी प्रयाग चिखली गावाला 'फॅन्सी नंबरचं गाव' अशी नवी ओळख निर्माण करून दिली.

फॅन्सी नंबरचं वेड : कोल्हापूरची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या प्रयाग चिखली या गावाची लोकसंख्या 7 हजार 500 इतकी आहे. गावातील ग्रामस्थ प्रामुख्यानं शेती करतात. पंचगंगा नदीच्या काठावर सुपीक शेतजमीन ओलिताखाली असल्यानं येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीसह पशुपालन व्यवसायावर चालतो. मात्र, या गावाला गेली चार दशकं फॅन्सी नंबरचं वेड आहे.

वाहनांच्या क्रमांकावरून ओळखली जातात घरं (Source - ETV Bharat Reporter)

फॅन्सी नंबरसाठी सर्वाधिक अर्ज : गावातील प्रत्येक घरात चार चाकी आणि दुचाकी घेताना कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे फॅन्सी नंबरसाठी सर्वाधिक अर्ज याच गावातून येतात. हा पारंपरिक हौसेचा वारसा नवी पिढीही पुढं नेत आहे. घरात नवीन येणाऱ्या वाहनाला कोणता फॅन्सी नंबर असावा याची चर्चा कुटुंबात होते. त्यानंतरच नव्या वाहनाला 92, 9596, 5353, 7777, 9695, 7500 यासह अनेक फॅन्सी नंबर घेतले जातात. गावात नवीन येणाऱ्या पाहुण्यांनाही आता याच नंबरवरुन घरांची ओळख तयार होऊ लागली आहे. देशभरातील नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी भारत सरकारनं आधार कार्ड नंबर सक्तीचे केले. मात्र, या गावानं वाहनांचे फॅन्सी नंबर प्राणपणानं जपून 'फॅन्सी नंबरचं गाव' अशी ओळख निर्माण केल्याची प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांनी दिली.

तरुण पिढी आग्रही : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थ शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरही फॅन्सी नंबरसाठी आग्रही आहेत. तर फॅन्सी नंबरची गाडी आणि गाडीसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा नवा ट्रेंड नव्या पिढीकडून सुरू आहे.

फॅन्सी नंबरसाठीचे हेलपाटे थांबणार : "वाहनांना सर्वाधिक फॅन्सी नंबर घेणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. दुचाकी चारचाकी वाहनांसह शेतीच्या कामांना लागणाऱ्या वाहनांनाही कोल्हापूर जिल्ह्यात पसंतीचा क्रमांक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासाठीच प्रादेशिक परिवहन विभागाकडून 'महा परिवहन' हे ॲप लॉन्च करण्यात आलं असून या ॲपद्वारे पसंती क्रमांक मिळवण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपवर जाऊन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून हवा तो नंबर मिळवता येतो. यासाठी वाटेल तितकी रक्कम मोजण्यासाठी शौकीन तयार असतात. एकाच घरात एकाच क्रमांकाची वाहनं असावी, त्यासाठी हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी वाहनधारकांची आणि फॅन्सी नंबर घेणाऱ्या शौकिनांची आहे. ही प्रणाली 26 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे," असं कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. कडुनिंबाचे झाड न उगवणारं महाराष्ट्रातील अनोखं गाव!
  2. बांबूनं आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती
  3. बारावी पास रिक्षावाला शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करू शकतो मग तुम्ही का नाही?

Last Updated : Nov 29, 2024, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.