ETV Bharat / state

पुण्यात प्रियकरानं केली सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या; 'Oyo' मध्ये झाला गेम - Software Engineer woman shot dead

Woman killed in OYO Hotel : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसर येथे शनिवारी (27 जानेवारी) रात्री 'ओयो' हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडाली. (Pune Murder News) मध्यरात्री महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय.

Woman Murder Case
महिलेची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 6:56 PM IST

Updated : Jan 28, 2024, 7:58 PM IST

महिलेच्या हत्याकांड प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी

पिंपरी चिंचवड (पुणे) Woman killed in OYO Hotel : Oyo हॉटेलमधील हत्येनं शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आलीय. मृत महिला उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. पुढील चौकशी हिंजवडी पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा महिलेचा प्रियकर आहे. (Pimpri Chinchwad Murder Case) त्याने शनिवारी (27 डिसेंबर) रात्री उशिरा महिलेची हत्या केली. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड : महिलेची हत्या करून ऋषभ मुंबईच्या दिशेनं फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. महिलेचा खून का करण्यात आला? हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मृत महिला एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणारा आहे. तो पुण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महिला आणि ऋषभ हे बरोबर होते. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात ऋषभने महिलेवर हल्ला करून तिची हत्या केली. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून तो पळून गेला.

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड : महिलेची हत्या करून ऋषभ मुंबईच्या दिशेने फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. महिलेचा खून का करण्यात आला?, हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला?, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. संबंधित प्रकारात प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मृत महिला एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणारा आहे. तो पुण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महिला आणि ऋषभ हे बरोबर होते. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात ऋषभने महिलेवर हल्ला करून तिची हत्या केली. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून तो पळून गेला.

आरोपी आणि मृत महिला हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत. मृत महिला पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर आहे. 25 जानेवारीला त्यांचं संबंधित हॉटेलमध्ये रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळं 25 तारखेपासूनच ते हॉटेलमध्ये सोबत राहत होते. पुढील तपास सुरू आहे - विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस

हत्या करून ऋषभ मुंबईकडे निघाला : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ हा महिलेला भेटायला पुण्यात आला होता. त्यानंतर काल रात्री दोघे हिंजवडी परिसरातील ओयो हॉटेलमध्ये एका खोलीत थांबले. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला आणि ऋषभने महिलेची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो मुंबईच्या दिशेने फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला रात्रगस्ती दरम्यान अटक केली आणि हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले. वृषभ आणि महिलेमध्ये नेमका काय वाद झाला होता आणि त्याने पिस्तूल कुठून आणले होते? या संदर्भात पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा:

  1. अज्ञात हल्लेखोरांकडून इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची हत्या; दोन देशांमध्ये पुन्हा वाढणार तणाव
  2. एका हातात राजीनामा तर दुसऱ्या हातात भाजपाचं समर्थन पत्र; नितीश कुमार 'खेला' करणारच
  3. "शेतकऱ्यांपुढे एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत", नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? पाहा व्हिडिओ

Last Updated : Jan 28, 2024, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.