ETV Bharat / state

बारामती लोकसभेसाठी स्वत: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा

Sharad Pawar announced Supriya Sule for Baramati Lok Sabha : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारं वाहू लागलय. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. तर, काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आज (दि. 9 मार्च)रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली असून, तशी घोषणा आज त्यांनी भोर येथील मेळाव्यात केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:56 PM IST

सभा

पुणे : Sharad Pawar announced Supriya Sule for Baramati Lok Sabha : लोकसभा निडवणुकांच्या तोंडावर देशभरात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आता सर्वच पक्षांकडून आपल्या उमेदवारांची नाव घोषीत होत आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून आपली पहिली यादी जाहीर झाली आहे. आता शरद पवारांनीही आपल्या उमेदवरांची नाव अधिकृतरित्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. आज भोर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

एकाच राज्याकडं लक्ष आहे : देशात लवकरच निवडणुका जाहीर होतील. 14 आणि 15 तारखेला निवडणूक आयोग कार्यक्रम आखेल अशी चर्चा आहे. देशाचं भविष्य आणि भवितव्यसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या देशाचे अनेकजणांनी नेतृत्व केलं. पण देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेली दहा वर्ष पाहिली तर आता बदल केला पाहिजे असं वाटायला लागलय असही पवार यावेळी म्हणाले आहेत. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे सगळं होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलायला तयार नाहीत अशी खंतही पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. सत्ता लोकांसाठी वापरायची असती. मात्र, असं न होता सत्तेचा गैरवापर होत आहे. पंतप्रधान यांचं एकाच राज्याकडं लक्ष आहे अस, म्हणत पवारांनी गुजरातचं नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे.

'विकास काय असतो, हे मी तुम्हाला दाखवून देईन' : आज मी तुमच्यासमोर सुप्रियाचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करत आहे. सुप्रियाचं संसदेतील काम महत्वाचं आहे. संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे उभं राहीन असा विश्वासही पवारांनी थोपटे यांना दिला आहे. याआधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्या सोबत रहा. शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो, हे मी तुम्हाला दाखवून देईन असा विश्वासच पवारांनी त्यांना यावेळी दिलाय. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

मिशन नाही कमिशनवर बोला : आजची सभा ही निष्ठावंतांची सभा होत आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकरी कर्जमाफी करू, पण गद्दारांना कधीही माफ करणार नाही. ही बारामतीची लढाई नाही तर महाराष्ट्राची लढाई आहे. ही लढाई पवार विरुद्ध मोदी आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. आपण आता विचार करायचा आहे. आपल्याला काही लोक सोडून गेले, अजूनही जातील. तसंच, ज्यांना आमदार खासदार मंत्री बनवलं ती जनता आणि पवार साहेब इथच आहेत असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर जोरदार प्रहार केला. भाजपचे नेते अमित शहा मिशिन 45 म्हटले आहेत. पण तुम्ही मिशन नाही कमिशनवर बोला असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक स्पेशल भारत रत्न द्यायला हव. ते कोणतं तर जलद गतीने फेका-फेक म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा लागेल अशी खरमरीत टीकाही राऊत यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा :

1 "मी उंटावरुन शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

2 महायुतीतील जागावाटप 'या' तारखेला जाहीर होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

3 शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक; राज ठाकरेंकडं चर्चेसाठी मांडला प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.