ETV Bharat / state

गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश - Naxalite Encounter Gadchiroli - NAXALITE ENCOUNTER GADCHIROLI

Naxalite Killing Gadchiroli : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये 10 मे, 2024 रोजी नक्षलविरोधी अभियानात जवानांना मोठं यश मिळालं होतं. यामध्ये 12 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं होतं. या घटनेनंतर आता गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळ आज (13 मे) नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. यामध्ये तीन नक्षलवाद्यांना ठार केले गेले, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Naxalite Killing Gadchiroli
नक्षलवादी साहित्य (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 8:57 PM IST

गडचिरोली Lok Sabha Election 2024 : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर : पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलीस विभागाला मिळाली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 'सी-६०'च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परिसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

शस्त्र, नक्षल साहित्य जप्त : गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह परमिली दलमचा प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडंट वासूचा असल्याचे निष्पन्न झाले. महिला नक्षलवाद्यांची ओळख अद्यापतरी पटलेली नाही. गोळीबाराच्या ठिकाणाहून घटनास्थळी तीन स्वयंचलित शस्त्रे, एक एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास असे साहित्य आणि नक्षल साहित्य आढळून आले आहे. हे साहित्य जप्त केले असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. या परिसरात नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

नक्षलवाद्यांकडून हत्यार लुटण्याचा प्रयत्न : नक्षलविरोधी अभियान राबवताना जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांना ठार मारण्याच्या आणि हत्यार लुटण्याच्या उद्देशानं जवानांच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. यावेळी नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेनं गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

मृत नक्षलवाद्यांमध्ये यांचा समावेश : चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले असता, घटनास्थळावर 01 पुरुष आणि 02 महिला नक्षलवादी मृत अवस्थेत आढळले असून सदर मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये डीव्हीसीएम कमांडर वासु समर कोरचा (रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छत्तीसगड) , रेश्मा मडकाम (वय 25 वर्षे, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड), कमला मडावी (वय 24 वर्षे, रा. दक्षिण बस्तर एरीया छत्तीसगड ) यांचा समावेश आहे.

'या' पोलीस अधिकाऱ्यांनी बजावले कर्तव्य : हे अभियान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश व पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून सी-60 कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच या भागात नक्षलवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचावण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा :

  1. जालन्यात मतदान यंत्रांची अदलाबदल; आमदारानं थांबवलं मतदान - Lok Sabha election 2024 Phase 4
  2. सिंगापूरहून मतदानाचा हक्क बजावण्याकरिता आले पुण्यात; यादीत नाव नसल्यानं व्यक्त केला संताप - Lok Sabha Election 2024
  3. "मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाकरिता हेलिकॉप्टरमधून १२ ते १३ कोटी रुपये नेले, लवकरच..."- संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut news today

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.